IPL 2022 PBKS vs RCB : नाणेफेक जिंकून आरसीबीचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; दोन्ही संघांची 'अशी' आहे प्लेइंग इलेव्हन

IPL 2022 PBKS vs RCB : नाणेफेक जिंकून आरसीबीचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; दोन्ही संघांची 'अशी' आहे प्लेइंग इलेव्हन
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 60 व्या सामन्या ब्रेबॉर्न स्टेडियवर साडेसातला सुरुवात होणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्ज ( PBKS vs RCB ) आमने सामने असणार आहेत. या सामन्यात दोन्ही संघ प्लेऑफसाठी एकमेकांना काट्याची टक्कर देण्याची शक्यता आहे. रॉयल चॅलेंजर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील 60 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्ज ( Royal Challengers Bangalore vs Punjab Kings ) संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला शुक्रवारी (12 मे) संध्याकाळी साडेसातला ब्रेबॉर्न स्टेडियवर सुरुवात होणार आहे. दोन्ही संघाच्या दृष्टीने हा सामना जिंकणे खुप महत्वाचे आहे. ज्यामुळे दोन्ही संघाचे प्लेऑफचे भवितव्य ठरणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि मयंक अग्रवाल यांच्यात नाणेफेक पार पडली आहे.रॉयल चॅलेंजर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( Royal Challengers Bangalore opt to bowl ) आहे.
-
🚨 Toss Update 🚨@RCBTweets have elected to bowl against @PunjabKingsIPL.
— IndianPremierLeague (@IPL) May 13, 2022
Follow the match ▶️ https://t.co/jJzEACTIT1 #TATAIPL | #RCBvPBKS pic.twitter.com/xyx7pc62X3
रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरु संघ ( RCB Team ) 12 पैकी 7 सामने जिंकून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी फक्त एक विजय आवश्यक आहेत. दुसरीकडे, पंजाब किंग्जने 11 पैकी 5 सामने जिंकले असून ते 10 गुणांसह आठव्या स्थानावर आहेत आणि त्यांना प्लेऑफमध्ये जाण्यासाठी सर्व सामने जिंकावे लागतील.
-
🚨 Team News 🚨@RCBTweets remain unchanged.
— IndianPremierLeague (@IPL) May 13, 2022
1⃣ change for @PunjabKingsIPL as Harpreet Brar is named in the team.
Follow the match ▶️ https://t.co/jJzEACTIT1 #TATAIPL | #RCBvPBKS
A look at the Playing XIs 🔽 pic.twitter.com/8g80LI9kOr
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, भानुका राजपक्षे, मयंक अग्रवाल (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चहर, हरप्रीत ब्रार आणि अर्शदीप सिंग.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि जोश हेझलवूड.
हेही वाचा - Ipl 2022 Updates : डेव्हिड वॉर्नरच्या त्रिफळाचितवर माजी खेळाडूची मोठी प्रतिक्रिया, म्हणाला...
