IPL 2022 MI vs CSK : नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; 'अशी' आहे दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

IPL 2022 MI vs CSK : नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; 'अशी' आहे दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( Mumbai Indians vs Chennai Super Kings ) संघात आयपीएल 2022 चा 59 वा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तत्पुर्वी बई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय ( Mumbai Indians opt to bowl ) घेतला आहे. सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरुवात होईल.
मुंबई: गुरुवारी आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 59 वा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( Mumbai Indians vs Chennai Super Kings ) संघात पार पडणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरुवात होईल. तत्पुर्वी दोन्ही संघाचे कर्णधार रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यात नाणेफेक पार पडली. मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय ( Mumbai Indians opt to bowl ) घेतला आहे.
-
#MumbaiIndians have won the toss and they will bowl first against #CSK
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2022
Live - https://t.co/WKvmUFxvMF #CSKvMI #TATAIPL pic.twitter.com/aer2yME8wZ
मुंबई आणि चेन्नई संघातील यंदाचा हा दुसरा सामना आहे. या अगोदर झालेल्या सामन्यात चेन्नईने मुंबईला 3 विकेट्सने मात दिली होती. आयपीएलच्या आतापर्यंत मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज संघात 33 सामने खेळले गेले आहेत. ज्यापैकी 19 सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने आपले वर्चस्व राखले आहे. त्याचबरोबर 14 सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने विजय मिळवला आहे.
-
A look at the Playing XI for #CSKvMI
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2022
Live - https://t.co/WKvmUFxvMF #CSKvMI #TATAIPL https://t.co/hOoLGDHDLM pic.twitter.com/xXUNfLLddw
चेन्नई सुपर किंग्ज संघ ( Chennai Super Kings team ) 11 पैकी चार सामने जिंकून गुणतालिकेत नवव्या स्थानावर असून अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सने चालू मोसमात 11 पैकी केवळ दोनच सामने जिंकले असून गुणतालिकेत ते तळाच्या स्थानावर आहेत आणि प्लेऑफच्या शर्यतीतून बाद होणारा पहिला संघ आहे.
-
Match 59.Mumbai Indians XI: R Sharma (c), I Kishan (wk), T Stubbs, T Varma, D Sams, T David, R Singh, J Bumrah, H Shokeen, K Kartikeya Singh, R Meredith. https://t.co/c5Cs6DqFJi #CSKvMI #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2022
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, मोईन अली, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार), ड्वेन ब्राव्हो, महेश थेक्षाना, सिमरजीत सिंग आणि मुकेश चौधरी.
-
Congratulations to Tristan Stubbs as he makes his IPL debut 👏 👏#TATAIPL | #CSKvMI | @mipaltan pic.twitter.com/0m98PnIl2N
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2022
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, ट्रिस्टन स्टब्स, रमणदीप सिंग, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकीन, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ
