SAvIND 3rd Test : दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 111 धावांची गरज ; तर भारत 8 विकेट्सने दूर

author img

By

Published : Jan 14, 2022, 9:33 AM IST

SAvIND 3rd Test

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात तिसरा कसोटी सामना खेळला (SAvIND 3rd Test fourt day) जात आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिका संघाला विजयासाठी 111 धावांची गरज आहे. त्याचबरोबर भारतीय संघाला 8 विकेट्सची आवश्यकता आहे. त्यामुळे आज कोण बाजी मारणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

केपटाउन: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात कसोटी मालिकेतील ( INDvSA 3rd Test Match ) तिसरा आणि अंतिम कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार भारतीय संघाने पहिल्या डावात विराट कोहलीच्या (Captain Virat Kohli) 79 धावांच्या जोरावर 77.3 षटकांत सर्वबाद 223 धावा (India 1st Innings ) केल्या होत्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाने आपल्या पहिल्या डावात कीगन पीटरसनच्या (Batsman Keegan Peterson) शानदार 72 धावांच्या मदतीने 76.3 षटकांत सर्वबाद 210 धावा केल्या ( South Africa 1st Innings) होत्या. त्यामुळे भारतीय संघाने पहिल्या डावाच्या जोरावर 13 धावांची आघाडी (India lead by 13 runs ) घेतली होती.

रिषभ पंतच्या शतकाने भारताला तारले -

दुसर्‍या डावात भारतीय संघाच्या फलंदाजाने साफ निराशा केली. कारण आघाडीचे फलंदाज पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर ढासळत होते. त्यामुळे भारतीय संघाचा दुसर्‍या डावातील मार्ग खडतर झाला होता. परंतु यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने एक बाजू लावून धरत आपले शतक (Rishabh Pant century) पूर्ण केले. मात्र एकाबाजूने पडझड सुरूच होती. अखेर भारतीय संघाचा दुसरा डाव 67.3 षटकांत संपुष्टात आला. त्यामुळे भारतीय संघ दुसर्‍या डावात सर्वबाद 198 धावा (India 2nd innings) करू शकला. परंतु यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत 139 चेंडूत 100 धावांवर नाबाद राहिला.

विजयासाठी भारताला 8 विकेट्सची आणि दक्षिण आफ्रिकेला 111 धावांची गरज -

भारतीय संघाने तिसर्‍या दिवशी दक्षिण आफ्रिकेला 212 धावांचे लक्ष्य (South Africa target of 212 runs) दिले आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाने तिसरा दिवसाचा खेळ संपेपर्यंत 29.4 षटकांत 2 गडी गमावून 101 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरला 30 धावांवर बुमराहने तंबूत धाडले आहे. त्याचबरोबर मार्क्रमला 16 धावांवर शमीने बाद केले. तसेच सध्या कीगन पीटरसन हा तळ ठोकून आहे. तो 48 धावांवर खेळत आहे. तसेच तो भारतीय संघाच्या विजयासाठी अडचण ठरत आहे. आज चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिका संघाला विजयासाठी 111 धावांची आवश्‍यकता आहे. त्याचबरोबर भारतीय संघाला विजयासाठी अजून 8 विकेट्स घेण्याची गरज (India need 8 wickets to win) आहे.

हेही वाचा - IPL 2022 Update : यंदा आयपीएलचा हंगाम 'या' देशात आयोजित केला जावू शकतो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.