IND vs ENG : भारतीय संघाने चौथ्या कसोटीसाठी राखीव गोलंदाजाचा संघात केला समावेश

author img

By

Published : Sep 1, 2021, 4:33 PM IST

IND vs ENG 4th Test : Karnataka speedster Prasidh Krishna added to main Test squad

भारतीय संघाने चौथ्या कसोटी सामन्याच्या एक दिवस आधी संघात एक मोठा बदल केला आहे. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला संघात स्थान देण्यात आले आहे.

ओव्हल - भारतीय संघाने चौथ्या कसोटी सामन्याच्या एक दिवस आधी संघात एक मोठा बदल केला आहे. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याला संघात स्थान देण्यात आले आहे. आतापर्यंत कृष्णा राखीव खेळाडू म्हणून संघात होता. अशात त्याला चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा दारूण पराभव झाला. आता मालिका 1-1 अशा बरोबरीत आहे. पहिला कसोटी सामना ड्रॉ राहिला. तर लॉर्डसमध्ये खेळवण्यात आलेला कसोटी सामना भारताने जिंकला होता.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करत, प्रसिद्ध कृष्णाला संघात घेतल्याची माहिती दिली आहे. इतर खेळाडू पहिल्यासारखं संघात आहेत. आता राखीव खेळाडू म्हणून फक्त अरजान नगवासवाला शिल्लक राहिला आहे. परंतु अद्याप मयांक अगरवाल, उमेश यादव, अक्षर पटेल, हनुमा विहारी, आर. अश्विन, वृद्धीमान साहा, अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ आणि सुर्यकुमार यादव यांना खेळण्याची संधी मिळालेली नाही. अशात प्रसिद्ध कृष्णाला संघात स्थान मिळाल्याने त्याची चौथ्या कसोटीत जागा फिक्स मानली जात आहे.

कोण आहे प्रसिद्ध कृष्णा

प्रसिद्ध कृष्णा याने 9 प्रथम श्रेणी सामने खेळली आहेत. यात त्याने 34 गडी बाद केले आहेत. त्याने अखेरचा प्रथम श्रेणी सामना मागील वर्षी मार्चमध्ये खेळला होता. याआधी त्याने भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने 3 एकदिवसीय सामन्यात 6 गडी बाद केले आहेत. याशिवाय लिस्ट ए च्या 51 सामन्यात त्याच्या नावे 87 विकेट आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 47 सामन्यात 41 फलंदाजांना तंबूत धाडलं आहे.

हेही वाचा -ICC Test Rankings: कसोटी क्रमवारीत रोहितची भरारी, विराटची घसरण, जो रूट अव्वलस्थानी

हेही वाचा -IND vs ENG 4th Test: भारतीय संघ चौथ्या कसोटीत 'या' खेळाडूंना देऊ शकतं संधी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.