IND V/s ENG Women ODI : हरमनप्रीत कौरने फक्त 111 चेंडूत कुटल्या 143 धावा, इंग्लंडचा 88 धावांनी पराभव

author img

By

Published : Sep 22, 2022, 1:17 PM IST

हरमनप्रीत कौर

हरमनप्रीत कौरने ( Harmanpreet Kaur ) सनसनाटी शतक झळकावून भारताला इंग्लंडविरुद्ध मोठी धावसंख्या नोंदवण्यास मदत केली. भारताने 5 बाद 333 धावा करुन मोठे लक्ष्य उभे केले होते. अखेर इंग्लंडचा 88 धावांनी पराभव करत भारताने वनडे मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे.

हरमनप्रीत कौरने ( Harmanpreet Kaur ) बुधवारी कॅंटरबरीच्या सेंट लॉरेन्स ग्राऊंडवर इंग्लंडच्या महिला संघाशी लढताना तिचे सहावे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. समोरून आघाडी घेत भारताच्या कर्णधाराने 18 चौकार आणि 4 षटकार मारत धडाकेबाज खेळी केली. तिच्या खेळीने मंत्रमुग्ध झालेल्या प्रेक्षकांनी उभे राहून तिचे स्वागत केले.

एका टप्प्यावर भारताच्या डावाला तीन षटके शिल्लक असताना हरमनप्रीत 100 धावांवर फलंदाजी करत होती. त्यानंतर तिने 11 चेंडूत 43 धावा करत जबरदस्त आक्रमण केले. त्यानंतर भारताने 333/5 वर पूर्ण केल्यामुळे डोंगरा एव्हढा स्कोअर धाव फलकावर झळकला.

हरमनप्रीतने तिचे पाचवे एकदिवसीय शतक झळकावल्यामुळे तिने भारताची सलामीवीर स्मृती मानधनासोबत बरोबरी साधली. ही जोडी आता महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय शतकांसह भारताच्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. मिताली राज सात शतकांसह अव्वल स्थानावर आहे.

प्रत्युत्तरात बुधवारी कॅंटरबरी येथे इंग्लंडला २४५ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडे आता वनडे मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी आहे.

संक्षिप्त धावसंख्या- भारताने 5 बाद 333 (हरमनप्रीत 143*, देओल 58) इंग्लंडचा 245 (व्याट 65, रेणुका 4-57) 88 धावांनी पराभव केला

हेही वाचा - Bcci Agm Exclusive : बीसीसीआयची एजीएम यावेळी जोरदार चर्चेची ठरण्याची शक्यता, जाणून घ्या कोणाकडे आहे कल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.