कोहलीचा जबरा फॅन! जितक्या कोहलीच्या धावा, हॉटेलमध्ये तितकीच बिर्याणीवर सूट

कोहलीचा जबरा फॅन! जितक्या कोहलीच्या धावा, हॉटेलमध्ये तितकीच बिर्याणीवर सूट
Cricket World Cup Final 2023 : मुझफ्फरनगरच्या मकबूल चिकन बिर्याणी हॉटेलच्या मालकानं भन्नाट ऑफर दिली आहे. कोहलीनं जितक्या धावा केल्या आहेत, तेवढे टक्के ग्राहकांना सवलत दिली जात आहे. अंतिम सामन्यात बिर्याणीमध्ये सवलती व्यतिरिक्त कबाब देखील लोकांना मोफत दिले जातील, असं ते म्हणाले.
मुझफ्फरनगर Cricket World Cup Final 2023 : आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 चा अंतिम सामना आज भारत आणि ऑस्ट्रलिया यांच्यात होणार आहे. या सामन्याबाबत देशभरात उत्सूकता शिगेला पोहोचलीय. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये मकबूल चिकन बिर्याणी नावाच्या प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकानं चक्क विराट कोहलीनं धावा केल्यास मोफत बिर्याणी देऊ केलीय. हा हॉटेलवाला विराट कोहलीचा मोठा चाहता मानला जातो. या कारणास्तव त्यांनी विराट कोहलीच्या चाहत्यांना त्यांच्या प्रसिद्ध चिकन बिर्याणीवर ऑफर दिलीय.
काय म्हणाले हॉटेल मालक : मुजफ्फरनगरमध्ये मकबूल हॉटेल आहे. दानिश हा या हॉटेलचा मालक आहे. ते अनेक दिवसांपासून शहरात हॉटेल चालवतात. विराट कोहलीनं धावा केल्यास लोकांना बिर्याणी खायला देण्याची ऑफर हॉटेल मालक दानिश यांनी दिलीय. याबाबत माहिती मिळताच ईटीव्ही भारतची टीम मुझफ्फरनगरमध्ये पोहोचली. इथं टीमनं हॉटेलवाल्यांसोबत खास बातचीत केली. हॉटेल मालक दानिश म्हणाले की, असं काम केल्यानं त्यांना खूप आनंद मिळतो. आपल्या देशातील तरुणांचं धैर्यही वाढतं. सर्वात मोठा आनंद म्हणजे आपला देश 2023 च्या आयसीसी विश्वचषकाचं यजमानपद भूषवत असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसंच भारतीय संघातील सर्व खेळाडू जबरदस्त फॉर्मात आहेत. यामुळं खूप आनंद वाटतो हे त्यांचे राष्ट्रप्रेम आहे, असंही ते म्हणाले. गेल्या 3 सामन्यांपासून ते त्यांच्या हॉटेलमध्ये बिर्याणी देत आहे. या अंतिम सामन्यातही कोहली जितक्या धावा करेल त्याच्या हॉटेलमध्ये बिर्याणीवर तेवढी टक्के सूट देतात.
विश्वचषक जिंकल्यास कबाबही मोफत : हॉटेलवाले म्हणाले की, याशिवाय जर भारतीय संघानं आयसीसी विश्वचषक 2023 चा अंतिम सामना जिंकला तर बिर्याणीवर सूट देण्यासोबतच ते लोकांना मोफत कबाबही खायला देणार आहेत. हॉटेल मालक पुढं म्हणाले की, जर भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकला तर त्याला इतका आनंद होईल की तो शब्दात व्यक्त करू शकणार नाही. आज आयसीसी विश्वचषक 2023 चा अंतिम सामना आज ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात खेळला जाणार आहे. मुझफ्फरनगरच्या मकबूल बिर्याणीनं बिर्याणीवर सूट दिलीय. याशिवाय, विश्वचषक जिंकल्यानंतर ते आपल्या ग्राहकांना मोफत कबाब देखील देणार आहेत.
हेही वाचा :
