Aus W vs Ind W : राचेल हेन्सला दुखापत, दुसऱ्या सामन्याला मुकण्याची शक्यता

author img

By

Published : Sep 23, 2021, 4:36 PM IST

Aus W vs Ind W : rachel-haynes-doubtful-to-play-in-2nd-odi-against-india

राचेल हेन्सला सराव सत्रात दुखापत झाली. तिच्या हाताला चेंडू लागला आहे. यामुळे ती भारताविरुद्धच्या पुढील सामन्यात खेळणार की नाही, याबाबत शाशंकता आहे.

मेकॉय (ऑस्ट्रेलिया) - भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. उभय संघातील या मालिकेच्या पहिल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया संघाने 9 गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाची सलामीवीर फलंदाज राचेल हेन्सने या सामन्यात दमदार कामगिरी केली. पण आता तिला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया संघाची चिंता वाढली आहे.

राचेल हेन्सला सराव सत्रात दुखापत झाली. तिच्या हाताला चेंडू लागला आहे. यामुळे ती भारताविरुद्धच्या पुढील सामन्यात खेळणार की नाही, याबाबत शाशंकता आहे.

राचेल हेन्सने पहिल्या सामन्यात नाबाद 93 धावांची खेळी करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला. हेन्सच्या हाताचा स्कॅन करण्यात आला आहे.

क्रिकेट डॉट कॉम एमयूच्या नुसार, राचेल हेन्सने दुखापत झाल्यानंतर सराव सत्रातून माघार घेतली. ऑस्ट्रेलियाचे फिजिओ केट बीयरवर्थ यांनी सांगितलं की, राचेल हेन्सच्या हाताला दुखापत झाली असून तिचा स्कॅन करण्यात आला आहे.

दरम्यान, राचेल हेन्सची दुखापत जर गंभीर असेल तर ती पुढील सामन्याला मुकू शकते. अशात हेन्सच्या जागेवर एलिसा हिलीसोबत बेथ मुनी डावाची सुरूवात करू शकते.

भारतीय संघ एकदिवीस मालिकेत पिछाडीवर

डार्सी ब्राउन (4/33) हिची शानदार गोलंदाजी यानंतर राचल हेन्स (नाबाद 93) आणि एलिसा हिली (77) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने भारतीय महिला संघाचा 9 गडी राखून पराभव केला. यजमान ऑस्ट्रेलिया संघाने या विजयासह 3 सामन्याच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

हेही वाचा - DC VS SRH : दिल्ली कॅपिटल्सला जबर धक्का; अष्टपैलू खेळाडूला दुखापत

हेही वाचा - MCC Big Change: 'बॅट्समन' नाही आता 'बॅटर्स' शब्दाचा होणार वापर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.