भारताचे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन, शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली

author img

By

Published : Jul 28, 2021, 9:41 AM IST

Updated : Jul 28, 2021, 10:32 AM IST

Indian badminton legend Nandu Natekar dies at 88

भारताचे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे आज पुण्यात निधन झाले. ते 88 वर्षांचे होते.

मुंबई - भारताचे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे आज पुण्यात निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. नाटेकर कुटुंबियांनी निधनाची माहिती पत्रकाद्वारे दिली. दरम्यान, नंदू नाटेकर हे परदेशात भारताला पहिले विजेतेपद जिंकून देणारे बॅडमिंटनपटू होतं.

नंदू नाटेकर यांच्या कुटुंबियांनी पत्रकात म्हटलं आहे की, आम्ही जड अंतकरणाने तुम्हाला माहिती देत आहेत की, आमचे प्रिय वडिल नंदू नाटेकर यांचे आज निधन झालं आहे. सध्या लागू असलेल्या कोरोनाच्या नियमावलीमुळे आम्ही शोकसभेचे आयोजन केलेले नाही. त्यांच्यासाठी प्रार्थना करा.

नंदू नाटेकर यांचा जन्म 1933 साली महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात झाला. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. 1953 साली त्यांनी हा सामना खेळला. ते 1954 च्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशीपच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले होते. यानंतर ते कधीही या स्पर्धेत सहभागी झाले नाहीत. यानंतर त्यांनी १९५६ मध्ये क्वालालंपूर येथील सेलांगोर इंटरनॅशनल स्पर्धा जिंकून तेव्हा ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती. भारताचे हे परदेशातील पहिले विजेतेपद आहे.

नंदू नाटेकर यांनी बॅडमिंटनशिवाय टेनिस तसेच क्रिकेटमध्ये देखील आपलं नशिब आजमावलं. टेनिसमध्ये त्यांनी ज्यूनियर स्पर्धा खेळली. नंतर ते बॅडमिंटनकडे वळले. त्यांनी महान रामानाथन कृष्णनन यांच्याविरुद्ध देखील सामना खेळला आहे.

नंदू नाटेकर यांच्या नावे १०० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विजेतेपदे आहेत. तसेच त्यांनी प्रत्येकी सहावेळा पुरुष एकेरी आणि दुहेरीचे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले होते. त्यांना 1961 साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अर्जुन पुरस्कार पटकावणारे नंदू नाटेकर हे पहिले बॅडमिंटन खेळाडू होतं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत नंदू नाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली. पवार त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात की, "आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन दुःखदायक आहे. आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त करणारे ते पहिले भारतीय बॅडमिंटनपटू व क्रीडा क्षेत्रातील अर्जुन पुरस्कारावर नाव कोरणारे पहिले खेळाडू होते. नाटेकर कुटुंबियांच्या दुःखात सहसंवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!"

हेही वाचा - ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदके जिंकणाऱ्या खेळाडूंची संपूर्ण यादी, एका क्लिकवर

हेही वाचा - Live Tokyo Olympics: पी. व्ही. सिंधू सलग दुसऱ्या विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत

Last Updated :Jul 28, 2021, 10:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.