Tollywood Corona Update : कटप्पा फेम कलाकार सत्यराज यांनाही कोरोनाची लागण

author img

By

Published : Jan 12, 2022, 3:22 PM IST

Tollywood Corona Update

बाहुबलीमध्ये कटप्पाची (Bahubali Katappa Fame actor) सुपरहिट भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सत्यराज (Satyaraj Corona Positive) यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडाकर ( Madhur Bhandrakar ) आणि प्रियदर्शन (Priyadarshan Corona Positive) यांनाही कोरोना झाला आहे.

मुंबई - सध्या अनेक अभिनेत्यांना कोरोनाची लागण होत आहे. बाहुबलीमध्ये कटप्पाची (Bahubali Katappa Fame actor) सुपरहिट भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सत्यराज (Satyaraj Corona Positive) यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर ( Madhur Bhandrakar ) आणि प्रियदर्शन (Priyadarshan Corona Positive) यांनाही कोरोना झाला आहे. अभिनेत्री त्रिशा कृष्णन (Trisha Krinshan) हिने शनिवारी सोशल मीडियावर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे सांगितले आहे.

कटप्पा आहे विलगीकरणात

कटप्पा फेम अभिनेता सत्यराज कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर शुक्रवारी चेन्नईतील रुग्णालयात गेला होता. सध्या सत्यराज क्वारंटाईनमध्ये आहेत. 'सर्व खबरदारी आणि सुरक्षेचे उपाय घेतल्यानंतरही माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. तुम्ही ज्या लक्षणांचे नाव घेतात ते माझ्यामध्येही आहेत. हे सर्वात वेदनादायक आहे. मी आता बरे होत आहे आणि माझ्या लसीकरणामुळे मला बरे वाटत आहे, मी सर्वांना विनंती करतो की, मास्क घाला.

मधुर भांडारकरांची पोस्ट

चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर ( Madhur Bhandrakar ) यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिहिले की, 'माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. लसीकरण केल्यानंतरही, माझ्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे मी स्वत:ला आयसोलेट केले आहे. आजकाल माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी.

प्रियदर्शनलाही कोरोना

प्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शन (Priyadarshan Corona Positive) देखील कोरोनाचे बळी ठरले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांना चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - Bigg Boss 15: असीम रियाझने भाऊ उमर रियाझच्या 'अयोग्य' हकालपट्टीवर दिली प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.