झुंडशाहीला धक्का देणार, माझ्या भूमिकेत फरक नाही: अभिनेता किरण माने

author img

By

Published : Jan 14, 2022, 4:20 PM IST

Updated : Jan 14, 2022, 5:23 PM IST

अभिनेता किरण माने

'मुलगी झाली हो' या दूरचित्रवाणी मालिकेमध्ये 'विलास पाटील' ही भूमिका साकारणारे साताऱ्यातील कलावंत किरण माने यांना वाहिनीने सोशल मिडीयावर राजकीय भूमिका घेतल्याच्या निषेधार्थ काढून टाकले आहे. किरण माने यांनी 'झुंडशाहीला धक्का देणार, माझ्या भूमिकेत फरक होणार नाही' अशी प्रतिक्रीया 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

सातारा : 'मुलगी झाली हो' या दूरचित्रवाणी मालिकेमध्ये 'विलास पाटील' ही भूमिका साकारणारे साताऱ्यातील कलावंत किरण माने यांना वाहिनीने सोशल मिडीयावर राजकीय भूमिका घेतल्याच्या निषेधार्थ काढून टाकले आहे. किरण माने यांनी 'झुंडशाहीला धक्का देणार, माझ्या भूमिकेत फरक होणार नाही' अशी प्रतिक्रीया 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

अभिनेता किरण माने

हॅशटॅग स्टँड विथ किरण माने

वाहिनीच्या कृतीवर बोटचेपी भूमिका घेतल्याचा आरोप करत सातारकरांनी 'हॅशटॅग स्टँड विथ किरण माने' अशी हॅशटॅग मोहीम सुरू केली आहे. 'मुलगी झाली हो' मालिकेत विलास पाटीलची भूमिका साकारणारे अभिनेता किरण माने यांना मालिकेतून तडकाफडकी काढून टाकण्यात आलं आहे. किरण हे त्यांच्या भूमिकांसोबतच सोशल मीडियावर परखडपणे मत व्यक्त करण्यासाठीही ओळखले जातात. त्यांच्या अनेक पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होत असते.

माझं काम चोख होतं

एक पोस्टमुळे त्यांना 'मुलगी झाली हो' या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यावर किरण माने यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या खास मुलाखतीत खुलासा केला की, "मी माझ्या कामात कोणतीही चुक नाही केली. मी वेळेवर शुटिंगला हजर रहायचो. कोणतंही गैरवर्तन माझ्याकडून सेटवर झालेलं नाही. नेहमीप्रमाणेच मी जीवतोडून माझ्या भुमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र मला काम थांबविण्यासाठी सांगण्यात आलं. का तर माझ्या सोशल मिडीयावरील पोस्टमुळे काही ठराविक वर्गाची मनं दुखावली गेली आहेत.

अभिनेता किरण माने
अभिनेता किरण माने

माझा कोणावर वैयक्तिक आकस नाही

मला हा आरोप मान्य नाही. मी कोणाचं नाव घेऊन पोस्ट केलेल्या नाहीत. महागाई, बेरोजगारी, विकास याबाबत मी ऊठवलेले प्रश्न महत्त्वाचे आहेत. आणि त्यावर मी बोलत राहणार. ही तर झुंडशाही झाली. या झुंडशाहीला धक्का देत राहणार. माझ्या भुमिकेत फरक होणार नाही' असंही किरण माने यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना स्पष्ट केले.

हेही वाचा - सांस्कृतिक दहशतवादाचा बळी, किरण माने!

Last Updated :Jan 14, 2022, 5:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.