"A फक्त तूच"मध्ये चिन्मय उदगीरकर आणि सुरुची आडारकर पहिल्यांदाच एकत्र

author img

By

Published : Oct 19, 2021, 10:25 PM IST

Updated : Jun 28, 2022, 9:52 AM IST

चिन्मय उदगीरकर आणि सुरुची आडारकर

नुकतेच एक नवीन मराठी चित्रपट, "A फक्त तूच" चे टीजर पोस्टर लाँच झाले आहे ज्यात एक नवीन फ्रेश जोडी दिसेल. टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहोचलेले चिन्मय उदगीरकर आणि सुरुची आडारकर "A फक्त तूच" या चित्रपटात एकत्र येत आहेत.

मराठी चित्रपटांची गाडीसुद्धा रुळावर येताना दिसतेय. तयार चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित होण्यासाठी तयारी करीत असताना अनेक नवीन चित्रपटांची घोषणा होतेय. त्याचबरोबर नवीन सिनेमांचे मुहूर्त होताहेत तसेच ट्रेलर, टिझर रिलीज होताहेत. नुकतेच एक नवीन मराठी चित्रपट, "A फक्त तूच" चे टीजर पोस्टर लाँच झाले आहे ज्यात एक नवीन फ्रेश जोडी दिसेल. टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहोचलेले चिन्मय उदगीरकर आणि सुरुची आडारकर "A फक्त तूच" या चित्रपटात एकत्र येत आहेत.

A फक्त तूच
A फक्त तूच

"A फक्त तूच" या चित्रपटात एका वेगळ्या नात्याची गोष्ट उलगडणार असून दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपटाचं टीजर पोस्टर श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या चरणी लाँच करण्यात आलं. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती. चित्रपटाची कथा रंगनाथ बबन पाचंगे यांची असून, प्रफुल एस. चरपे यांनी पटकथा, संवाद लेखन केलं आहे. राजू भोसले क्रिएटिव्ह प्रोड्यूसर, मंगेश भिमराज जोंधळे कार्यकारी निर्माता आहेत तर रणजित माने यांनी छायांकन, सागर गायकवाड यांनी कला दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. प्रियांका दुबे यांनी वेशभूषा तर समीर कदम हे रंगभूषाकार म्हणून काम पाहणार आहेत.

जयदीप फिल्म प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन रंगनाथ बबन पाचंगे करत आहेत. ‘कारण नातं वेगळं आहे...’ ही चित्रपटाची टॅगलाईन आहे आणि पोस्टरमध्ये समुद्राची उसळलेली लाट, गुलाबाचं फुल हातात घेतलेल्या त्याच्या हातावर तिनं ठेवलेला हात दिसत आहे. त्यामुळे एक अनोखी, वेगळी आणि रोमँटिक कथा चित्रपटातून पहायला मिळेल असा अंदाज टीजर पोस्टरवरून करता येतो.

टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवलेले चिन्मय उदगीरकर आणि सुरुची आडारकर ही फ्रेश जोडी चित्रपटाचं वैशिष्ट्य ठरणार आहे. चिन्मय उदगीरकर आणि सुरुची आडारकर यांच्यासह या चित्रपटात माधुरी पवार, शिल्पा ठाकरे, तेजस्विनी शिर्के, ऋषिकेश वाम्बुरकर, गीत निखारगे यांच्या भूमिका आहेत.

"A फक्त तूच" या चित्रपटाचे चित्रीकरण येत्या नोव्हेंबर महिन्यात सुरु होणार आहे.

हेही वाचा - विकी कौशलने दाखवले पाठीवरील फटक्यांचे घाव, युजर म्हणाला, "कॅटरिना दुःखी होईल"

Last Updated :Jun 28, 2022, 9:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.