पंजाब निवडणुकीत बहिणीचा प्रचार करणार नाही सोनू सूद

author img

By

Published : Jan 13, 2022, 5:53 PM IST

सोनू सूद

सोनू सूद पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या बहीण मालविकाचा प्रचार करणार नाही. जाणून घ्या का?

मुंबई - जगभर पसरलेल्या प्राणघातक कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर पैसा आणि शरीराने लोकांच्या मदतीसाठी मैदानात उतरलेला अभिनेता सोनू सूद गरिबांचा मसिहा म्हणून ओळखला जातो. जेव्हा जेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक अभिनेत्याकडे मदतीची याचना करतात तेव्हा कलाकार त्यांच्या मदतीसाठी उघडपणे पुढे येतो. सोनू सूदच्या नावचा देशभर बोलबाला आहे. अशा परिस्थितीत अभिनेता राजकारणात येऊ शकतो, अशी अटकळ बांधली जात होतीसोनूने हे टाळले, परंतु सोनू सूदची बहीण मालविका अलीकडेच काँग्रेसमध्ये सामील झाली आहे आणि पंजाबमध्ये निवडणूक लढवणार आहे. दरम्यान, सोनू सूद पंजाब निवडणुकीत बहिणीसाठी प्रचार करणार नसल्याची बातमी समोर आली आहे.

पंजाबमध्ये फेब्रुवारीमध्ये विधानसभेची निवडणूक आहे आणि अभिनेत्याची बहीण पंजाबच्या मोगा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. जेव्हा सोनूला एका मुलाखतीत विचारण्यात आले की तो आपल्या बहिणीसाठी प्रचार करणार का, तेव्हा सोनू सूद म्हणाला, 'मला खूप अभिमान आहे की तिने हे पाऊल उचलले आहे. ती अनेक वर्षांपासून पंजाबमध्ये राहते आहे आणि तेथील लोकांच्या समस्या तिला समजतात. मला आनंद आहे की ती लोकांच्या थेट संपर्कात असेल आणि त्यांना मदत करण्यास सक्षम असेल.

सोनू सूद पुढे म्हणाला, ''हा तिचा राजकीय प्रवास आहे आणि माझा राजकारणाशी काहीही संबंध नाही. मी जे करत आहे ते करत राहीन. मी त्याच्यासाठी प्रचार करणार नाही कारण तिने स्वत: कठोर परिश्रम करावे आणि त्यात सहभागी व्हावे अशी माझी इच्छा आहे. जिथपर्यत माझा संबंध आहे, मी राजकारणापासून लांब राहणार आहे.''

हेही वाचा - Happy Lohri 2022 : अक्षय कुमार, विकी कौशलसह सेलेब्रिटीनी दिल्या लोहरीच्या शुभेच्छा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.