Lalbaugcha Raja First Look : लालबागच्या राजाचं यंदाचं पहिले दर्शन, पहा व्हिडिओ
मुंबई: लालबागच्या राजाचे यंदाचं प्रथम दर्शन आज गणेशभक्तांना झालयं. लालबागच्या राजाचे दर्शन तुम्ही थेट प्रक्षेपणातून घेऊ शकणार आहात. मुंबईसह देशातील प्रसिद्ध अशा 'लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा' अशी ख्याती असलेल्या गणेशाच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळांन मुंबईचा राजासाठी साडेपाच कोटींचा तर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं साडे सव्वीस कोटींचा विमा उतरवला आहे, अशी माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिलीय. हा विमा उत्सवापासून ते मुर्ती विसर्जनपर्यंत चालू असणार आहे. त्याचप्रमाणे लालबागच्या राजाच्या अंगावरचे दागीने आणि मौल्यवान वस्तू (विमा लाभ उत्सवापासून ते मूर्ती विसर्जन आणि परत आणण्यापर्यंत विमा लाभ चालू राहिल) यासाठी सात कोटी चार लाख रुपयांचा विमा उतरवण्यात आला आहे.