भयानक.. रशियाच्या पर्म विद्यापीठात अज्ञाताचा अंदाधुंद गोळीबार, 8 जणांचा मृत्यू

author img

By

Published : Sep 20, 2021, 2:59 PM IST

Updated : Sep 20, 2021, 3:46 PM IST

firing-at-perm

रशियाच्या पर्म विद्यापीठात एका माथेफिरूने अंदाधून गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये कमीत-कमी आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या गोळीबारानंतर सगळीकडे पळापळ झाली असून वाचण्यासाठी विद्यार्थ्यांनी खिडक्यातून बाहेर उड्या मारल्या.

मॉस्को - शियातील पर्म विद्यापीठात एका माथेफिरूने हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. विद्यापीठात अज्ञात हल्लेखोराने अचानक गोळीबार केला. अचानक झालेल्या या गोळीबारामुळे वर्ग आणि इमारतीमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांनी जीव वाचवण्यासाठी खिडक्या आणि छतावरून उड्या मारत धूम ठोकली. या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर कमीत कमी 6 जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.

  • #UPDATE | Eight people were confirmed killed, six injured in a shooting on the campus of a university in the Russian city of Perm: Russia's RT

    — ANI (@ANI) September 20, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सुत्रांच्या माहितीनुसार हल्लेखोर 18 वर्षांचा आहे. हल्ला करण्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर हल्ल्याची माहिती दिली होती. पर्म विद्यापीठ रशियातील पर्म शहरात आहे. येथे देशभरातील विद्यार्थी शिकण्यासाठी येत असतात. सुरक्षा दलांनी हल्लेखोरास अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये घाबरलेले विद्यार्थी जीव वाचविण्यासाठी खिडक्यांमधून व इमारतीच्या छतावरून उडी मारताना दिसत आहेत. पर्म स्टेट यूनिवर्सिटीमध्ये हा हल्ला झाला आहे. पर्म शहर हे मॉस्कोपासून 700 मैल (1,100 किलोमीटर) दूर आहे. विद्यापीठात सुमारे 12 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

Last Updated :Sep 20, 2021, 3:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.