Zhelensky Speech In US Congress : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्कींना युएस काँग्रेसमध्ये 'स्टॅंडींग ओवेशन'

author img

By

Published : Mar 16, 2022, 8:08 PM IST

Russia Ukraine War

रशिया-युक्रेन युद्धाच्या ( Russia-Ukraine War ) पार्श्वभूमीवर आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की ( Ukraine President Volodymyr Zelensky address to US Congress ) यांनी युएस काँग्रेसला संबोधित केले. झेलेन्स्कीयांचे भाषण झाल्यानंतर युएस काँग्रेसमध्ये स्टॅंडींग ओवेशन ( Zelensky Received Standing Ovation In US Congress ) देण्यात आले.

हैदराबाद - रशिया-युक्रेन युद्धाच्या ( Russia-Ukraine War ) पार्श्वभूमीवर आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की ( Ukraine President Volodymyr Zelensky address to US Congress ) यांनी युएस काँग्रेसला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी आतापर्यंत अमेरिकेने युक्रेनला केलेल्या मदतीसाठी आभारी असल्याचे म्हटले. झेलेन्स्कीयांचे भाषण झाल्यानंतर युएस काँग्रेसमध्ये स्टॅंडींग ओवेशन देण्यात आले.

काय म्हणाले झेलेन्स्की? -

अमेरिकेने आतापर्यंत केलेल्या मदतीसाठी आम्ही त्यांचे आभार मानतो. रशियाने केलेला हल्ला हा केवळ आमच्यावर, आमच्या भुमीवर किंवा आमच्या शहरावर केलेला हल्ला नाही. रशियाचा हल्ला हा आमच्या मुल्ल्यांवर केलेला हल्ला आहे. हा हल्ला म्हणजे स्वत:च्या देशात मुक्तपणे जगण्याच्या आमच्या हक्क तसेच आमच्या स्वप्नावर केलेले आक्रमण आहे, असे झेलेन्स्की म्हणाले.

हेही वाचा - MLA Fund Increased In Maharashtra: आमदारांसाठी अजित पवारांची मोठी घोषणा.. आमदार निधीत घसघशीत वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.