पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्यासाठी भारताला दरवर्षी 100 अब्ज डॉलर एफडीआयची गरज

author img

By

Published : Aug 10, 2021, 2:04 PM IST

पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्यासाठी भारताला दरवर्षी 100 अब्ज डॉलर एफडीआयची गरज

पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे ध्येय गाठण्यासाठी भारताला दरवर्षी किमान 100 अब्ज डॉलर्सच्या परदेशी थेट गुंतवणुकीची गरज असल्याचे भारत-अमेरिका धोरणात्मक सहकार्य मंचाचे प्रमुख मुकेश अघी यांनी म्हटले आहे.

वॉशिंग्टन : पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे ध्येय गाठण्यासाठी भारताला दरवर्षी किमान 100 अब्ज डॉलर्सच्या परदेशी थेट गुंतवणुकीची गरज असल्याचे भारत-अमेरिका धोरणात्मक सहकार्य मंचाचे प्रमुख मुकेश अघी यांनी म्हटले आहे.

परकीय गुंतवणुकीत मोठा हिस्सा अमेरिकेचा असेल

भारताची अर्थव्यवस्था सध्या 2.7 ट्रिलियन डॉलर एवढी आहे. 5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे ध्येय गाठण्यासाठी भारताला मोठ्या प्रमाणात थेट परकीय गुंतवणुकीची(एफडीआय) गरज भासणार आहे. भारताला दरवर्षी किमान 100 अब्ज डॉलर्सच्या परकीय गुंतवणुकीची गरज असून यातील मोठा भाग हा अमेरिकेचाच असेल असा मला विश्वास आहे असे अघी म्हणाले.

गुंतवणूक आकर्षित करण्याकडे लक्ष द्यावे

परकीय गुंतवणुकीला आकर्षिक करण्यासाठी काय करावे लागेल याकडे भारताने लक्ष देण्याची गरज आहे. अमेरिकेच्या दृष्टीकोनातून बघितले तर अमेरिकेने भारताच्या लस उत्पादन क्षमतेचा लाभ घेतला पाहिजे असे ते म्हणाले.

हेही वाचा - मोदींकडून 9.75 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 19,500 कोटी जमा, किसान सन्मान निधीचा नववा हफ्ता मिळाला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.