काबूलमध्ये केलेला ड्रोन हल्ला ही चूक; हल्लात अतिरेकी नव्हे तर 10 नागरिक मारले गेल्याने अमेरिकेची कबुली

author img

By

Published : Sep 18, 2021, 1:18 PM IST

white house

प्रसारमाध्यमांनी नंतर या घटनेवरील अमेरिकेच्या वक्तव्यावर शंका व्यक्त घेण्यास सुरुवात केली होती. या हल्लात ज्या वाहनाला निशाणा बनविण्यात आले होते त्याचा चालक अमेरिकन मानवतावादी संघटनेचा कर्मचारी होता. हे वृत्त स्फोटक असल्याचा पेंटागॉनच्या दाव्याच्या बाजूने कोणताही पुरावा नसल्याचेही बातमीमध्ये सांगण्यात आले. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात 6 मुलांसह एकूण 10 जणांचा मृत्यू झाला. ये 10 जण एकाच परिवाराचे सदस्य होते, असेही सांगण्यात येत आहे.

वॉशिंगटन (अमेरिका) - गेल्या महिन्यात अफगाणिस्तानातील मागिल महिन्यात करण्यात आलेल्या अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्याचा बचाव करणाऱ्या पेंटागॉनने (अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय) आता आपले विधान बदलले आहे. त्यांनी शुक्रवारी म्हटले की, अंतर्गत तपासात असे दिसून आले आहे की या हल्ल्यात फक्त नागरिक मारले गेल्याचे समोर आले आहे. तर इस्लामिक स्टेटचे अतिरेकी नव्हते. दरम्यान, या ड्रोन हल्ल्यात 10 लोक मारले गेले.

29 ऑगस्टच्या या हल्ल्यात लहान मुलांसह अनेक नागरिक मारले गेले. पण त्यानंतर चार दिवसांनी पेंटागॉनच्या अधिकाऱ्यांनी (अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय) सांगितले की हा पूर्णपणे अचूक हल्ला होता. अमेरिकेने काबूलमध्ये दावा केला आहे, की त्यांनी काबूल विमानतळावर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या आयसिसच्या आत्मघातकी कार बॉम्बरवर हल्ला केला होता. अमेरिकेने सांगितले की रविवारी त्याने काबुलमध्ये इसिस-के च्या संशयित दहशतवाद्यांना लक्ष्य करून हवाई हल्ला केला आहे.

प्रसारमाध्यमांनी नंतर या घटनेवरील अमेरिकेच्या वक्तव्यावर शंका व्यक्त घेण्यास सुरुवात केली होती. या हल्लात ज्या वाहनाला निशाणा बनविण्यात आले होते त्याचा चालक अमेरिकन मानवतावादी संघटनेचा कर्मचारी होता. हे वृत्त स्फोटक असल्याचा पेंटागॉनच्या दाव्याच्या बाजूने कोणताही पुरावा नसल्याचेही बातमीमध्ये सांगण्यात आले.

अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात 6 मुलांसह एकूण 10 जणांचा मृत्यू झाला. ये 10 जण एकाच परिवाराचे सदस्य होते, असेही सांगण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.