Today Petrol Diesel Rates : एका क्लिकवर वाचा, आजचे क्रिप्टोकरन्सी, पेट्रोल डिझेल व सोने चांदीचे दर
Updated: May 26, 2023, 9:42 AM |
Published: May 26, 2023, 9:42 AM
Published: May 26, 2023, 9:42 AM

मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रमाणे ज्वाला मिरचीच्या १०० किलोच्या दरात १७०० रुपयांची वाढ झाली आहे. पावट्याच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. तोंडलीच्या दरात ८०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. बाजारात भाजीपाल्यांची आवक वाढल्याने दर स्थिर असल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे.

1/ 10
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३२०० रुपये ते ३४०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, ७००० रुपये ते ९००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १२०० रुपये ते १४०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५००० ते ५५०० रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४७०० ते ५५००, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १२०० रुपये ते १४०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३४०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १००० रुपये ते १२०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २२०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ४४०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३३००रुपये ते ३६००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३६०० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये.

Loading...