Today Market rate 17 nov 2023 : सोनं-चांदी स्वस्त की महाग? जाणून घ्या, आजचे सोनं, पेट्रोल-डिझेलसह इतर गोष्टींचे बाजारभाव...
मुंबई Today Market rate 17 nov 2023 : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत 100 किलोंप्रमाणे टोमॅटोच्या दरात 600 तर शेवग्याच्या दरात 200 रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात महाराष्ट्रातील प्रमुख शहरात थोडासा बदल झाला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर ही महाराष्ट्रातील प्रमुख शहरं असून या शहरातील आजचे पेट्रोल डिझेल दर जाणून घेऊया. आज मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 94 रुपये 27 पैसे प्रति लिटर आहे. पुण्यात पेट्रोलचा दर 106.07 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 93 रुपये 46 पैसे प्रति लिटर आहे. नागपूरमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 63 पैसे आहे, तर डिझेलचा दर 93 रुपये 16 पैसे आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 77 पैसे आहे, तर डिझेलचा दर 93 रुपये 27 पैसे आहे. तसंच महाराष्ट्रात सोन्याचा दर 59,670 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 75,000 रुपये प्रति किलो आहे. बिटकॉईनचा दर 30,42,304 रुपये (cryptocurrency prices) आणि इथेरिअमचा दर 1,65,384 आहे.
