Republic day : देशभरात 'असा' साजरा केला जातोय प्रजासत्ताक दिवस, पाहा फोटो
Updated on: Jan 26, 2023, 10:40 AM IST

भारतात २६ जानेवारी या दिवसाला खास महत्त्व आहे. हा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिवस. या दिवशी नवी दिल्लीत डोळे दपून जावेत अशी परेड पाहायला मिळते. संपूर्ण जगाला भारताची काय ताकद आहे हे दिसते. याबरोबरच देशभरात अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. देशातील नागरिक वेगवेगळ्या प्रकारे आपली देशभक्ती व्यक्त करतात. या दिवसाला भारतात विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी भारत पूर्णपणे स्वातंत्र झाला होता. स्वातंत्र्यांनंतर सार्वभौम भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम तब्बल २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस सुरू होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान समितीने राज्यघटनेचा मसुदा तयार केला. हे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी स्वीकृत करण्यात आले. देश १५ ऑगस्टला स्वतंत्र झाला असला तरी २६ जानेवारीपासून भारताचे लोकशाही पर्व खऱ्या अर्थाने सुरू झाले. भारत या दिवशी लोकशाही, सार्वभौम, गणराज्य बनला. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
