Ashadhi Wari 2022 : जाय जाय तू पंढरी, होय होय वारकरी; पाहा, पालखी सोहळ्यातील खास छायाचित्र
Published on: Jun 23, 2022, 4:43 PM IST |
Updated on: Jun 23, 2022, 4:43 PM IST
Updated on: Jun 23, 2022, 4:43 PM IST

पुणे - दोन वर्षांच्या कालावधीनंतर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे हजारो भाविकांच्या उपस्थितीत माऊली माऊलीच्या जयघोषात पुण्यनगरीत आगमन झाले आहे. यावेळी लाखो वारकरी पालखीसह पुण्यात दाखल झाले आहेत. खांद्यावर भगवी पताका. गळ्यात तुळशीमाळ. टाळ-मृदुंगाचा नाद आणि विठू नामाचा गजर. अशा भक्तिरसात न्हाऊन निघालेली 'इंद्रायणी' पुण्यनगरीत विसावली. गेल्या काही वर्षांमध्ये या वारीमधील छायाचित्र टिपण्यासाठी अनेक तरुण तरुणी पुढे येतात. अशाच पुण्यातील गुरुवार पेठ येथे राहणारी एक मुस्लिम महिला फोटोग्राफर साजेदा सय्यद हिने टिपलेले पालखी सोहळ्याचे काही खास छायाचित्र...
1/ 11

Loading...