Ganesh Festival 2023: मानाच्या गणपतीसह राजकीय नेत्यांच्या घरी थाटात बाप्पाचं आगमन, गणेशचतुर्थीचे आजचे फोटो पाहा
मुंबई Ganesh Festival 2023 : सर्वच आजी-माजी मंत्री आणि नेते यांच्या निवासस्थानी विघ्नहर्ता गणरायाचं मोठ्या उत्साहात, जल्लोषापूर्ण व भक्तिमय वातावरणात आगमन झालंय. कामाच्या व्यस्ततेमुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दिल्लीला आल्यानं संध्याकाळी उशिरा ते नागपुरात दाखल झाले. त्याचबरोबर माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या घरातही गणेशाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. पुण्यात मानाच्या पाचही गणपतीचं उत्साहासात स्वागत करण्यात आलं. 14 विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या लाडक्या गणरायाचे आज आगमन झाले. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी सकाळपासूनच नागरिक रस्त्यावर आले. पुण्याचं ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंडळाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने पालखीत श्री ची आगमन मिरवणूक काढण्यात आली आहे. पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत होत. दहा दिवसांच्या या मंगलमय उत्सवासाठी पुण्यनगरी सज्ज झाली आहे.
