सर्वत्र राम भक्तीची लाट; प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी कशी सुरू आहे तयारी? पाहा फोटोंमधून

author img

By ETV Bharat Marathi Desk

Published : Jan 18, 2024, 7:33 PM IST

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha News Photos

अयोध्या Ayodhya Ram Mandir Photo Gallery : अयोध्या येथील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा येत्या 22 जानेवारीला होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलं आहे. या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं जगभरातील रामभक्त आपली सेवा प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यातच अयोध्येतील भगवान श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्यानिमित्त केवळ अयोध्या नगरीतच नव्हे, तर देशभरात मोठ्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अयोध्या नगरीमध्ये 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असून या अभूतपूर्व सोहळ्यास देशभरातून लाखो रामभक्त उपस्थित राहणार आहेत. तर यासंदर्भात पाहा काही फोटो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.