मृणाल ठाकूर आणि तेजस्वी प्रकाशच्या लेटेस्ट फोटोंची चाहत्यांना भुरळ
अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि तेजस्वी प्रकाश यांनी त्यांच्या लेटेस्ट फोटोंनी इंटरनेटवर चाहत्यांना वेड लावलंय. मृणालनं फोटोशूटसाठी हिरव्या लेहेंग्यात आपली चमक दाखवलीय. तर तेजस्वी प्रकाश कॉर्सेट ब्लाउजसह काळ्या साडीत खूप सुंदर दिसत आहे. त्यांचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडलेत.

1/ 12
सीता रामम स्टार मृणाल ठाकूर आणि नागिन स्टार तेजस्वी प्रकाश यांनी नुकत्याच झालेल्या दिवाळी सोहळ्यात त्यांच्या पोशाखानं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांच्या फॅशन निवडीनं नेहमीच फॅशन पोलिसांना आकर्षित केलंय आणि यावेळी त्यांनी त्यांच्या सुंदर दिसण्यानं चाहत्यांना चकित केलंय. मृणालनं शुभिकाच्या पापा डोंट प्रीचच्या शेल्फ् च्या लेहेंग्यासह पेअर केलेल्या हिरव्या ब्रॅलेट टॉपसह स्वतःला सजवलंय. मृणाल या पोशाखात सदाबहार सुंदर दिसत होती. या लूकमध्ये खूप सुंदर पोज तिनं दिल्या आहेत. दुसरीकडे, तेजस्वीनं एक काळी स्ट्रॅपलेस कॉर्सेट साडी निवडली आणि आपलं नैसर्गिक सौंदर्य या उत्तम मिश्रणासह आणखीन खुलवलं. ती नेहमीच चाहत्यांसाठी नवनवे प्रयोग करुन आपल्या आकर्षक फॅशनची जादु दाखवत असते. चाहत्यांच्या संपर्कात राहून ती आपले अपडेट्स नेहमी देत असते. तिचे लेटेस्ट फोटो पाहण्यासाठी पुढे स्क्रोल करा.
Loading...
Loading...
Loading...