Cannes 2023 : अदिती राव हैदरीने पिवळ्या बॉलगाऊनमध्ये रेड कार्पेटवर केले पदार्पण
Updated: May 26, 2023, 3:32 PM |
Published: May 26, 2023, 3:32 PM
Published: May 26, 2023, 3:32 PM

Cannes 2023 : अदिती राव हैदरी हिने कान्स २०२३ च्या रेड कार्पेटवर मायकेल सिन्कोने डिझाइन केलेल्या पिवळ्या बॉलगाऊनमध्ये वॉक केला. या फिल्म फेस्टमध्ये फ्लोअर-लेन्थ गाउनमध्ये अभिनेत्री जबरदस्त आकर्षक दिसत होती.

1/ 12
अदिती राव हैदरी हिने कान्स २०२३ च्या रेड कार्पेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. पहिल्यांदाच ती या कार्यक्रमात आली. आतापर्यत या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड अभिनेत्री उपस्थित होत्या. अनुष्का शर्माने यावर्षी कान्समध्ये पदार्पण केले नसताना, अदितीने तिच्या चाहत्यांचे मने जिंकले आहे, अदितीच्या फोटोसाठी तिची फार प्रशंसा ही सोशल मीडियावर केली जात आहे. गुरुवारी कान्सच्या रेड कार्पेटवर परतण्यासाठी, अदितीने दुबईस्थित फिलिपिनो डिझायनर मायकेल सिन्कोचा पिवळा बॉलगाऊन निवडला. कान्स 2023 च्या रेड कार्पेटवर अदिती एका राजकुमारी सारखी दिसत होती. तसेच अदितीने तिचे फोटो हे इंन्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहे. त्यावर अनेकांनी कमेंट देखील केल्या आहे. शिवाय तिच्या फोटोला चाहत्याने फार प्रचंड प्रमाणात लाईक केले आहे.

Loading...