Zee5 announces 111 new projects : झी५ ने १११ नव्या रंजक प्रोजेक्ट्सची केली घोषणा

author img

By

Published : May 23, 2023, 6:15 PM IST

Zee5 announces 111 new projects

झी५ ने आपल्या पाचव्या वर्धापनदिनी 'हुक्ड टू ५' अंतर्गत १११ नवीन कार्यक्रमांची घोषणा केली. हे महत्तवकांक्षी प्रोजेक्ट प्रेक्षकांची अभिरुची वाढवणारे असतील अशी खात्री दिली जात आहे. मुंबईत पार पडलेल्या या भव्य सोहळ्याला दिग्गज बॉलिवूड स्टार्सची मांदियाळी हजर होती.

मुंबई - १११ हा आकडा ब्रिटिश लोकांमध्ये अनलकी समजला जात असला तरी भारतीयांसाठी तो अंक शुभ मानला जातो. म्हणूनच झी५ ने आपल्या पाचव्या वर्धापनदिनी 'हुक्ड टू ५' अंतर्गत १११ नवीन कार्यक्रमांची घोषणा केली. त्यामुळे यावर्षी प्रेक्षकांना मनोरंजनाचा भरगच्च खजिना पाहायला मिळणार आहे. नुकतीच झी५ ने एक्सक्लुसिव्ह ओटीटी कन्टेन्ट निर्मितीची पाच वैभवशाली वर्षे साजरी करताना रंगारंग तारांकित सोहळ्याचे आयोजन केले होते ज्यात सेलिब्रिटीजची मांदियाळी उपस्थित होती. मनोज बाजपेयी, सोनाली बेंद्रे, गोल्डी बहल, द्रष्टी धामी, मोना सिंग, जयदीप अहलवात, अभिमन्यू सिंग, सई ताम्हणकर, अनिल शर्मा, शरिब हाश्मी, राजेश तेलंग, नितेश तिवारी, अश्विनी अय्यर तिवारी, अभिनय देव, आदिनाथ कोठारे सारख्या अनेक कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांनी आवर्जून हजेरी लावली होती.

झी५ वर १११ पेक्षा जास्त नवीन कार्यक्रम यावर्षी प्रक्षेपित होणार असून त्यात हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, बांगला, पंजाबी आणि मराठी भाषांमधील कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. यात भारतीय भाषांमधील खास मालिका, प्रेक्षकांनी पसंती दिलेल्या शोजचे सिक्वेलस्, खास ओटीटी साठी बनविलेला कंटेंट त्याचबरोबर गाजलेली नाटके, मनोरंजित करणाऱ्या डॉक्यु-सिरीज आणि इतरही गोष्टींचा समावेश असेल. झी५ ने वर्षभरासाठीचा ब्लॉकबस्टर कन्टेन्टचा भरगच्च खजिना घेऊन येणार असल्याचे जाहीर केले आहे.

मनीष कालरा, चीफ बिझनेस ऑफिसर, झी५ इंडिया यांनी सांगितले की, 'झी५ चे मनोरंजन अधिकाधिक उत्तम करताना नवनवीन शैली, फॉरमॅट्स, भाषा आणि कथा यांचा आम्ही वापर करणार आहोत. विविध भाषिक दर्शकांना भावेल असा एन्टरटेन्मेंट कन्टेन्ट देण्याचा आमचा प्रयत्न असेल. आम्ही धर्मा प्रॉडक्शन, सलमान खान फिल्म्स, गुनीत मोंगाज् सिख्या एंटरटेनमेंट, भानुशाली स्टुडिओ, द व्हायरल फीव्हर (टीव्हीएफ), गोल्डी बहलज् रोज ऑडिओ व्हिज्युअल्स, अ‍ॅप्लॉज एंटरटेनमेंट, सुधीर मिश्रा, विकास बहल, विवेक अग्निहोत्री आणि नागराज मंजुळे यांच्यासोबत सहयोग करार केला असून उत्तम कंटेंट घेऊन येत आहोत.'

पुनीत मिश्रा, प्रेसिडेंट-कन्टेन्ट व इंटरनॅशनल मार्केट्स, झी एंटरटेन्मेंट एन्टरप्रायजेस लिमिटेड यांनी सांगितले की, 'आजच्या तरुणाईला नवनवे बदल हवेसे वाटतात. त्यामुळे युवा पिढीला ध्यानात ठेऊनही शोज बनत आहेत. प्रीमियम प्रॉडक्शन हाऊसेस शी करार केल्यामुळे प्रेक्षकांना झी५ वर सलमान खान, पंकज त्रिपाठी, हुमा कुरेशी, सोनाली बेंद्रे, आर्या, विजय सेतुपती, नवाजुद्दीन सिद्दीकी, राधिका आपटे अशा अनेक मातब्बर कलाकारांच्या कलाकृती अनुभवता येणार आहेत.'

हेही वाचा - Khatron Ke Khiladi 13 : खतरों के खिलाडीचा सिझन 13 दक्षिण आफ्रिकेच्या जंगलात होणार शूट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.