मुंबई - Tanuja Hospital Discharged : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री काजोलची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची प्रकृती अलीकडेच खालावली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्या आयसीयूमध्ये असल्यानं त्यांचे अनेक चाहते निराश होते. अनेकजण त्यांच्यासाठी लवकरात लवकर बरे वाटसाठी प्रार्थना करत होते. तनुजा यांच्या प्रकृतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. तनुजा त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ही बातमी आता चाहत्यांसाठी मोठा दिलासा देणारी आहे.
तनुजा यांची चित्रपट कारकीर्द : तनुजा यांनी 1960 आणि 1970 च्या दशकातील अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'बहारें फिर भी आएंगी', 'मेरे जीवन साथी', 'जीने की राह' तसेच 'दया निया' यासारखे चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. त्यांचे गाजलेले चित्रपट 'पारे' आणि 'प्रथम कदम फूल' हे चित्रपट आहेत. 1950 मध्ये आलेल्या 'हमारी बेटी' या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. याशिवाय त्यांची बहीण नूतननेही याच चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. हा चित्रपट तनुजा यांची आई दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री शोभना समर्थ यांच्या दिग्दर्शनाखाली बनविण्यात आला होता.
तनुजा शेवटी या वेब सीरीजमध्ये दिसल्या : तनुजा यांनी छोट्या पडद्यावरही काम केलं आहे. 'आरंभ' आणि 'जुनून' या टीव्ही शोमध्ये त्यांनी काम केलं आहे. याशिवाय त्या प्राइम व्हिडिओच्या 2022 च्या 'मॉडर्न लव्ह: मुंबई' या वेब सीरीजमध्ये शेवटच्या दिसल्या होत्या. तनुजा या अभिनेत्री काजोल आणि तनिषा मुखर्जी यांची आई आहे. अनेकदा त्या काजोल आणि तनिषा मुखर्जीसोबत अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसत असतात. हिंदी चित्रपटसृष्टीत काजोलनं आपल्या मेहनतीच्या जोरावर अभिनय क्षेत्रात एक स्थान निर्माण केलं आहे. मात्र तिची घाकटी बहिण तनिषा मुखर्जी अजूनही बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करत आहे.
हेही वाचा :