दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यात झालं मराठी ऐतिहासिक चित्रपटाचं शूटींग!

author img

By

Published : Jul 18, 2022, 5:34 PM IST

दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यात झालं मराठी ऐतिहासिक चित्रपटाचं शूटींग

डॉ अमोल कोल्हे हे शिवप्रताप - गरुडझेप या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. महत्वाचे म्हणजे त्यांच्या या चित्रपटाचे शूटिंग चक्क दिल्लीच्या लाल किल्ल्यात झाले. हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद असले तरी तेथे चित्रीकरण करताना त्याच्या टीमला बरेच श्रम करावे लागले. त्याबद्दल डॉ अमोल कोल्हे यांनी समाज माध्यमावर सविस्तरपणे लिहिले.

मुंबई - डॉ अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका लीलया साकारतात. त्यांना शिवकाळाचा गाढ अभ्यास आहे. आता ते शिवप्रताप - गरुडझेप या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. महत्वाचे म्हणजे त्यांच्या या चित्रपटाचे शूटिंग चक्क दिल्लीच्या लाल किल्ल्यात झाले. हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद असले तरी तेथे चित्रीकरण करताना त्याच्या टीमला बरेच श्रम करावे लागले. त्याबद्दल डॉ अमोल कोल्हे यांनी समाज माध्यमावर सविस्तरपणे लिहिले.

ते लिहितात, “अशा वातावरणात शूटींग करणे म्हणजे वेडेपणा आहे, आग्र्याच्या लाल किल्ल्यात शूटींग? कसं शक्य आहे? अनेकांच्या अनेक शंका.... पण प्रत्यक्ष इतिहास जणू 356 वर्षांनंतर त्या घटनेला कॅमेऱ्याच्या लेन्स मधून पाहणार होता.. ASI नियमावलीचे पालन करता करता होणारी दमछाक, त्यात 38-40 डिग्री असलं तरी 70% आर्द्रतेमुळे 42-44 वाटणारं तापमान ते ही सकाळी 9 वाजता, चुकून टाचणी विसरली तरी किल्ल्यातून base camp पर्यंत पायपीट, ना बसायला खुर्ची ना पंखा.. सावलीसाठी आडोशाला उभं राहावं तर घामाच्या धारा आणि जरा हवेशीर ठिकाणी उभं राहावं तर उन्हाच्या झळा..रोज 4-5 जण अंथरूण धरायचे नाहीतर थेट हॉस्पिटल मध्ये.. तरी पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ' बचेंगे तो और भी लडेंगे' या ईर्षेने शूटिंग सुरु...

पण यात खरं कौतुक करायला हवं ते आमच्या टीम मधील सेटिंग boys, spot boys, light boys, costume dept, direction team, camera team ani junior artists चं..कारण या सर्व प्रतिकूलतेत ते सर्वजण ठाम होते.. महाराजांच्या पेहरावात मी जेव्हा लाल किल्ल्यात पाऊल ठेवलं तेव्हा भारावलेले, अगदी डोळे भरून तो प्रसंग डोळ्यात साठवणारे आणि 356 वर्षांपूर्वी घडलेल्या इतिहासाच्या पुनर्प्रत्ययाचे ते सर्वजण पहिले साक्षीदार होते...'Strenght of a Chain is judged by the strength of weakest link in the chain' या उक्ती प्रमाणे टीमची ताकद दाखवून देत होते आणि आमचा टीम leader, आमचा दिग्दर्शक कार्तिक केंढे तर पहाडासारखा त्या प्रतिकूलतेच्या छाताडावर पाय ठेवून उभा होता...मला जाणवत होतं की आपापल्या परीने प्रत्येक मावळा लढत होता..आणि प्रत्येकाची प्रेरणा लाल किल्ल्याकडे स्वाभिमानी नजर रोखून ताठ मानेने उभी होती... शतकानुशकं अजरामर प्रेरणा - छत्रपती शिवाजी महाराज!”

हेही वाचा - ''मला कोणच्या न्यायालयाने दोषी ठरवले? बनावट मीडियाला लाज वाटली पाहिजे", ललीत मोदीचा पलटवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.