दिलीप कुमारच्या आठवणीने व्याकुळ झाल्या सायरा बानो

author img

By

Published : Jun 15, 2022, 1:02 PM IST

सायरा बानो

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता दिलीप कुमार आपल्यात नसले तरीही त्यांची स्टाईल आणि अभिनय चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे. आता एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दिलीप साहेबांच्या आठवणीने सायरा बानो रडल्या आहेत.

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता दिलीप कुमार साहब आता आपल्यात नाहीत. जुलै 2021 मध्ये त्यांनी दीर्घ आजाराशी झुंज देत वयाच्या 95 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. दिलीपसाहेबांच्या जाण्याचं दु:ख त्यांच्या चाहत्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं. दिलीप कुमार यांच्या निधनाचा सर्वात मोठा धक्का त्यांच्या पत्नी सायरो बानो यांना बसला होता.

सायरा बानो यांनी शेवटच्या क्षणी दिलीप साहेबांची खूप काळजी घेतली. आजही सायरा बानो त्यांच्या आठवणीने भावूक होतात. आता सायरो बानो पुन्हा एकदा दिलीपसाहेबांच्या आठवणीने रडताना दिसल्या. खरंतर सायरा 'ट्रॅजेडी किंग' दिलीप साहब यांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेल्या होत्या. तिथे त्या भावूक झाल्या. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दिलीप साहेबांच्या आठवणीने रडल्या सायरा बानो - सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये सायरा बानो दिवंगत पती दिलीप साहेब यांच्या नावाने भारतरत्न डॉ. आंबेडकर पुरस्कार स्वीकारताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरम्यान, सायरा बानो पती दिलीपची आठवण करून एवढ्या भावूक झाल्या की त्यांचे अश्रू थांबत नव्हते.

चाहतेही झाले भावूक - आता जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरला तेव्हा सायरा बानूला या अवस्थेत पाहून चाहतेही भावूक झाले आणि कमेंट करू लागले. व्हिडिओमध्ये सायरा बानोला रडताना पाहून एका चाहत्याने लिहिले की, 'आजच्या युगात असे प्रेम मिळणे कठीण आहे'.

दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, 'दिलीप साहेब बघतच असतील.' त्याचवेळी दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, 'सायरा बानोच्या आयुष्यात आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये दिलीप साहबांची उणीव कोणीही भरून काढू शकत नाही'.

हेही वाचा - वरुण, कियारा, अनिल कपूरने मुंबईच्या ट्रॅफिकवर मात करण्यासाठी केला मेट्रोने प्रवास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.