Happy Birthday Nick Jonas: प्रियांका चोप्रानं पती निक जोनासला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत खास पोस्ट केली शेअर...

Happy Birthday Nick Jonas: प्रियांका चोप्रानं पती निक जोनासला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत खास पोस्ट केली शेअर...
Happy Birthday Nick Jonas: ग्लोबस स्टार प्रियांका चोप्रानं निकच्या वाढदिवसानिमित्त काही खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियांकाच्या या पोस्टवर अनेकजण अभिनंदनाचा वर्षाव करताना दिसत आहे.
मुंबई - Happy Birthday Nick Jonas: प्रियांका चोप्रा जोनासनं पती गायक निक जोनाससाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये निकला शुभेच्छा देत प्रियांका काही सुंदर फोटो इंस्टाग्राम शेअर केली आहेत. प्रियांकानं पहिला फोटो सेल्फीमधला पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती निकला किस करताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये ती निकसोबत पोझ देत फोटो काढत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये निक हा गोल्फ खेळताना दिसत आहे. चौथ्या फोटोमध्ये ती ही उभी आहे. पाचव्या फोटोमध्ये निक हा मुलगी मालतीला खायला घालताना दिसत आहे. प्रियांकानं शेअर केलेले हे फोटो खूप खास आहेत.
प्रियांकानं शेअर केली पोस्ट : प्रियांकानं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'तुझ्यासोबत आनंद साजरा करणं माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांपैकी एक आहे. तुम्ही मला अशा गोष्टी करण्यास प्रवृत्त केलेत जे मला शक्य वाटत नव्हत्या. मला कधीही माहित नसलेली शांतता दाखवली,आय लव्ह यू बर्थडे बॉय, मला आशा आहे की तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होतील, वाढदिवसाच्या शुभेच्छा बेब'. असं प्रियांकानं लिहलंय. प्रियांका चोप्राचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. या फोटोवर अनेकजण कमेंट करत निकला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. एका यूजरनं कमेंट करत लिहलं 'खूप खास निक आणि प्रियांकाची जोडी आहे' दुसऱ्या यूजरनं लिहलं 'निक चांगला पिता आणि पती आहे'. आणखी एका यूजरनं लिहलं. 'निक आणि मालती खूप सुंदर दिसत आहे' अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत. काहीजण या पोस्टवर फायर आणि हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत.
प्रियांका आणि निकचं लग्न : प्रियांका नेहमीच सोशल मीडिया अकाउंटवर सुंदर फोटो पोस्ट करत असते. ती आपल्या पती निक आणि मुलगी मालतीसह अनेक सुंदर फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर करते. प्रियांकानं डिसेंबर 2018 मध्ये निक जोनाससोबत हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार जोधपूरमध्ये लग्न केलं. त्यानंतर जानेवारी 2022 मध्ये, सरोगसीद्वारे या जोडप्यानं पहिल्या मुलाचं स्वागत केलं. प्रियांकाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटी अमेरिकन रोमँटिक कॉमेडी-ड्रामा चित्रपट 'लव्ह अगेन' मध्ये दिसली होती. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत सॅम ह्यूघन आणि सेलीन डीओन हे कलाकार होते. त्यानंतर ती हॉलिवूड अभिनेता रिचर्ड मॅडनसोबत अमेरिकन अॅक्शन थ्रिलर वेब सीरिज 'सिटाडेल'मध्ये दिसली होती. सध्या ती तिच्या आगामी अॅक्शन-कॉमेडी चित्रपट 'हेड्स ऑफ स्टेट'साठी शूटिंग करत आहे. यामध्ये तिच्यासोबत जॉन सीना दिसणार आहे.
हेही वाचा :
