Pathaan Blockbuster : दीपिका पदुकोण शाहरुख खानसाठी लकी, जोडीचा सलग चौथा ब्लॉकबस्टर

author img

By

Published : Jan 25, 2023, 1:17 PM IST

Etv Bharat

पठाण चित्रपटाने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. दीपिका पदुकोण शाहरुख खानसाठी लकी ठरली आहे, कारण या जोडीचा चौथा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरत आहे.

मुंबई - बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान पुन्हा एकदा त्याच्या स्टारडमकडे वाटचाल करताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शाहरुख मोठ्या पडद्यावर यशासाठी धडपडत होता. याआधीचे काही चित्रपट आहेत, जे शाहरुखला मोठे नाव देऊ शकले नाहीत, पण शाहरुख आपल्या बुडत्या कारकिर्दीला किनारा देण्यासाठी 'पठाण'वर अवलंबून होता. पठाण 25 जानेवारी रोजी देशभरातील आणि जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांना 'पठाण' खूप आवडत असून फॅनसह प्रेक्षकही समाधानी दिसत आहेत. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण ही जोडी 'पठाण' चित्रपटातून तब्बल 8 वर्षांनंतर पडद्यावर दिसणार आहे. शाहरुख खानसाठी दीपिका पदुकोण लकी आहे का असा विचार तुम्ही विचार करु शकता... कारण बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करणारा या जोडीचा हा चौथा चित्रपट आहे.

दीपिका पदुकोण म्हणजे शाहरुखची लकी चार्म? - दीपिका पदुकोणची हिट जोडी 'पठाण'मधून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 8 वर्षांनंतर शाहरुख खान त्याच्या लकी चार्म दीपिका पदुकोणसोबत मोठ्या पडद्यावर परतला आहे आणि तो हिट होण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे, शाहरुख खानने दीपिका पदुकोणला फिल्म इंडस्ट्रीत लॉन्च केले होते.

दीपिका पदुकोणचा बॉलिवूड डेब्यू ओम शांती ओम
दीपिका पदुकोणचा बॉलिवूड डेब्यू ओम शांती ओम

ओम शांती ओम (2007) मधून दीपिकाचे पदार्पण - दीपिका पदुकोणचा बॉलिवूड डेब्यू चित्रपट 'ओम शांती ओम' (2007) होता, ज्याचे दिग्दर्शन फराह खानने केले होते. या चित्रपटात शाहरुख-दीपिकाच्या जोडीने पहिल्यांदाच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 35 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'ओम शांती ओम' चित्रपटाने जगभरात 108 कोटींची कमाई केली होती.

चेन्नई एक्सप्रेसमध्ये शाहरुख आणि दीपिका
चेन्नई एक्सप्रेसमध्ये शाहरुख आणि दीपिका

'चेन्नई एक्स्प्रेस'ने पुन्हा वेग पकडला - 'ओम शांती ओम' नंतर शाहरुख खान 'भूतनाथ' (2008), 'रब ने बना दी जोडी' (2008), 'बिल्लू' (2009), 'माय नेम इज खान' (2010), 'रा-वन' (2011), 'डॉन-2' (2011), 'जब तक है जान' (2012) सारख्या चित्रपटात दिसला. 'माय नेम इज खान' वगळता शाहरुखचे बाकीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सरासरी ठरले. यानंतर 2013 साली पुन्हा एकदा शाहरुख-दीपिकाची जोडी दिसली. अॅक्शन दिग्दर्शक रोहित शेट्टीने 'चेन्नई एक्सप्रेस' चित्रपटात शाहरुख-दीपिकाला कास्ट केले. 'चेन्नई एक्स्प्रेस' हा चित्रपट 70 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता, ज्याने जगभरात 400 कोटींची कमाई केली आणि पुन्हा एकदा शाहरुखच्या करिअरला वेग आला.

हॅप्पी न्यू इयरमधील एक सीन
हॅप्पी न्यू इयरमधील एक सीन

'हॅपी न्यू इयर'चाही धमाका - एका वर्षानंतर, शाहरुख-दीपिका जोडीने 'हॅपी न्यू इयर' (2014) या चित्रपटाने पुन्हा बॉक्स ऑफिसवर टक्कर दिली. हा चित्रपट फराह खानने 150 कोटींच्या बजेटमध्ये बनवला होता, ज्याने जगभरात 408 कोटींची कमाई केली होती. 2014 सालानंतर शाहरुखच्या खात्यात एकही हिट चित्रपट आला नाही आणि शाहरुख खानचा काळ संपत चालला होता.

बिल्लू चित्रपटातील शाहरुख दीपिका यांचे गाणे
बिल्लू चित्रपटातील शाहरुख दीपिका यांचे गाणे

शाहरुख 8 वर्षे फ्लॉप - 'हॅपी न्यू इयर' (2014) या चित्रपटानंतर शाहरुख खान एकही हिट चित्रपट देऊ शकला नाही. यादरम्यान तो 'झिरो' (2018), 'जब हॅरी मेट सेजल' (2017), 'रईस' (2017), 'डियर जिंदगी' (2016), 'फॅन' (2015) आणि 'दिलवाले' (2015) मध्ये दिसला होता. शाहरुख खानचे हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष काही करू शकले नाहीत आणि किंग खानचे स्टारडम डळमळीत होऊ लागले.

'शांती'सोबत 'बादशाह' 8 वर्षांनंतर परतला - आता मोठ्या पडद्यावर 8 वर्षांनंतर शाहरुख खानने 'पठाण' चित्रपटासाठी 'ओम शांती ओम' 'शांती' दीपिका पदुकोणची निवड केली आहे. ही जोडी बॉक्स ऑफिसवर कमाईच्या इतिहासाची पुनरावृत्ती करणार आहे. कारण 250 कोटींच्या प्रचंड बजेटमध्ये बनलेला 'पठाण' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी ब्लॉकबस्टर ठरत आहे.

पहिल्या दिवशी पठाण 40 ते 50 कोटी रुपयांची कमाई करेल अशी अपेक्षा आहे. ओपनिंग वीकेंडपूर्वीच हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा गाठेल, असेही बोलले जात आहे. असे झाले तर शाहरुख-दीपिकाच्या हिट जोडीचा चित्रपट 'पठाण' बॉक्स ऑफिसवर कमाईचे मोठे रेकॉर्ड तोडताना दिसणार आहे. त्याचबरोबर काजोलप्रमाणेच शाहरुखसोबत दीपिका पदुकोणची हिट जोडीही प्रसिद्ध होणार आहे.

हेही वाचा - Pathaan Movie Leaked Online : पठाण चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच टोरेंटवर लीक? वाचा काय आहे सत्य...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.