लेडी सुपरस्टार नयनतारावरील नेटफ्लिक्स डॉक्यूमेंट्रीचा टीझर रिलीज

author img

By

Published : Sep 24, 2022, 3:25 PM IST

लेडी सुपरस्टार नयनतारा

नेटफ्लिक्सने शनिवारी नयनतारा बियॉन्ड द फेयरीटेल टीझरचे लॉन्चिंग केले. डॉक्युमेंट्री सर्वात खासगी परंतु अत्यंत लोकप्रिय सुपरस्टार, नयनतारा हिच्याबद्दल आहे.

मुंबई - स्ट्रीमिंग जायंट नेटफ्लिक्सने शनिवारी अभिनेत्री नयनताराच्या ( Nayanthara ) दिग्दर्शक विग्नेश शिवनसोबतच्या ( director Vigensh Shivan ) लग्नाचा स्वप्नवत टीझर सोडला, जो नयनतारा - बियॉन्ड द फेयरीटेल ( Nayanthara - Beyond The Fairytale ) या डॉक्युमेंट्रीमध्ये दाखवला जाईल.

झकीर खान आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी यांनी होस्ट केलेल्या स्ट्रीमिंग पोर्टलच्या तुडुम 2022 कार्यक्रमात टीझरचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमात आगामी भारतीय आशयाच्या स्लेटची घोषणा करण्यात आली.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

एका मिनिटापेक्षा जास्त कालावधीच्या टीझरमध्ये नयनतारा, हिला लेडी सुपरस्टार म्हणून टॅग केले गेले आहे आणि विग्नेश यांचा डेटिंग ते त्यांच्या लग्नापर्यंतचा प्रवास दाखवला आहे. त्याच्या प्रेयसीबद्दल बोलताना, शिवन असे म्हणतात: "ती एक अद्भुत मनुष्य आहे". टीझर हळूहळू पण सुंदरपणे तिच्या मोठ्या सेलेब्रिटी होण्याच्या दिशेने पुढे सरकतो.

नयनथारा-बियॉन्ड द फेयरीटेल ही अत्यंत खासगी पण अत्यंत लोकप्रिय सुपरस्टार, नयनतारा हिची गोष्ट आहे. तिचे जीवन, पॅशन, लग्न आणि त्यापलिकडच्या आयुष्यात डोकावयाची संधी प्रेक्षकांना देते.

तिच्या प्रवासाबद्दल बोलताना, टीझरमध्ये फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी 100 2018 च्या यादीत स्थान मिळवणारी नयनतारा असे म्हणते, "जेव्हा हे सर्व सुरू झाले, तेव्हा ते कसे असेल याची मला कल्पना नव्हती. मी चित्रपटसृष्टीतील बालक नव्हते. फक्त एक सामान्य मुलगी आहे, जिला ती जे काही करते त्यात तिला 100 टक्के द्यायचे असते."

या माहितीपटाचे दिग्दर्शन गौतम वासुदेव मेनन यांनी केले आहे. नयनतारा आणि शिवन 2015 पासून डेट करत होते. दोघांनी जून 2022 मध्ये महाबलीपुरममध्ये लग्न केले.

हेही वाचा - Louise Fletcher: ऑस्कर विजेत्या लुईस फ्लेचरचे निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.