National Cinema Day : आज फक्त 75 रुपयांमध्ये कोणताही सिनेमा पाहा मल्टीप्लेक्समध्ये

author img

By

Published : Sep 22, 2022, 11:59 AM IST

Updated : Sep 23, 2022, 7:17 AM IST

National Cinema Day

मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने आपल्या ट्विटरवरुन राष्ट्रीय सिनेमा डेची आठवण करुन देण्यासाटी पोस्ट लिहिली आहे. २३ सप्टेंबर रोजी देशभरातील 4 हजार मल्टिप्लेक्समध्ये 75 रुपयांना तिकीट विकले जाणार आहेत. त्यामुळे तुमच्या आवडीचा चित्रपट निवडून त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता.

मुंबई - चित्रपट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. खरंतर ही चांगली बातमी मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने या महिन्याच्या सुरुवातीला घोषित केली होती की 16 सप्टेंबर हा राष्ट्रीय चित्रपट दिन असेल. देशभरातील 4 हजार मल्टिप्लेक्समध्ये 75 रुपयांना तिकीट विकले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, 16 सप्टेंबरला तसे होऊ शकले नाही. असोसिएशनने नंतर पुन्हा जाहीर केले की राष्ट्रीय चित्रपट दिन आता 23 सप्टेंबर रोजी देशभरात साजरा केला जाईल.

अनेक सिनेमा हॉलमध्ये त्याच्या आधारे बुकिंगही सुरू झाले आहे. चित्रपटाच्या बुकिंगला विक्रमी सुरूवात झाल्याचे ट्विट मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने केले आहे. ''2022 मध्ये नॅशनल सिनेमा डे हा नवीन सिनेमा उपस्थितीचा विक्रम प्रस्थापित करेल असा अंदाज आहे. - तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ राज्य सरकारमुळे सहभागी होऊ शकत नाही'', असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

PVR यावर्षी 25 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. यानिमित्ताने ही ऑफर देशभरातील ४ हजार मल्टिप्लेक्समध्ये या शुक्रवारी म्हणजेच २३ सप्टेंबरपासून PVR सिनेमागृहात लागू करण्यात आली आहे.

या शहरात मिळणार नाही फायदा - पीव्हीआर (PVR 25 Anniversary) ने आपल्या घोषणेमध्ये म्हटले आहे की ही ऑफर हैदराबाद, कोचीसह अनेक दक्षिण भारतीय शहरांमधील PVR मध्ये उपलब्ध असणार नाही. एकीकडे PVR च्या या घोषणेने देशभरातील लोक खूश आहेत. मात्र हैदराबाद आणि कोचीसह अनेक दक्षिण भारतीय शहरांमध्ये राहणारे लोक निराश होतील, कारण 'डोंगलुन्नारू जगराथा', 'कृष्ण वृंदा विहारी' आणि 'अल्लुरी' हे चित्रपट शुक्रवारी तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहेत.

  • - National Cinema Day is estimated to set a new Cinema Attendance record in 2022
    - Telangana, Andhra Pradesh, Tamil Nadu and Kerala unable to participate due to State Government
    regulations w.r.t Movie Ticket Pricing

    — Multiplex Association Of India (@MAofIndia) September 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त इतर अनेक मल्टिप्लेक्सही ऑफर देत आहेत, मात्र प्रेक्षकांना याची माहिती नाही. अशा परिस्थितीत लोक राष्ट्रीय चित्रपट दिन का साजरा करत आहेत, हेही प्रेक्षकांना समजत नाही.

दरम्यान मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने आपल्या ट्विटरवरुन राष्ट्रीय सिनेमा डेची आठवण करुन देण्यासाटी पोस्ट लिहिली आहे. त्यांनी म्हटलंय, भारतातील पहिल्या "राष्ट्रीय चित्रपट दिना" ची ही हळुवार आठवण !! या शुक्रवारी फक्त ₹७५ मध्ये सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टरचा अनुभव घ्या, आमच्या भारतातील सर्व भागीदारी सिनेमागृहांमध्ये. चला २३ सप्टेंबर २०२२ रोजी चित्रपटांची जादू साजरी करूयात."

  • Here's a gentle reminder for India's first ever "National Cinema Day!"
    Experience the biggest blockbusters at just ₹75 this Friday, at all our partnered cinemas across India. Let's celebrate the magic of movies on 23rd September, 2022.#NationalCinemaDay2022 #September23

    — Multiplex Association Of India (@MAofIndia) September 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - Raju Srivastava Funeral: आज राजू श्रीवास्तव पंचतत्वात होणार विलीन.. चाहते दु:खात बुडाले

Last Updated :Sep 23, 2022, 7:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.