Athiya KL Rahul wedding:रोहन श्रेष्ठ, अर्जुन कपूर आणि अंशुला संगीत समारंभात उपस्थित

Athiya KL Rahul wedding:रोहन श्रेष्ठ, अर्जुन कपूर आणि अंशुला संगीत समारंभात उपस्थित
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची बहीण अंशुला कपूर यांनी अथिया शेट्टी आणि केएल राहुल संगीत समारंभात उपस्थिती दर्शवली. लग्नाच्या ठिकाणी आलेला फॅशन फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ हा देखील दिसला जो या जोडप्याचा जवळचा मित्र असल्याचे म्हटले जाते.
मुंबई - सुनिल शेट्टींच्या घरात लग्नाची तयारी सुरू झाली आहे. अथिया शेट्टी आज खंडाळ्यात तिचा प्रियकर केएल राहुलसोबत लग्न करत आहे आणि लग्नाच्या विधींना सुरुवात होत असताना अनेक सेलिब्रिटींनी या जोडप्याच्या संगीत सोहळ्याला हजेरी लावली आहे.
अर्जुन कपूर त्याची बहीण अंशुला कपूर आणि फॅशन फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ यांसारखे सेलिब्रिटी खंडाळ्यात अथिया आणि राहुलच्या संगीत समारंभात सहभागी झाले आहेत. आतापर्यंत, लग्नाच्या ठिकाणाचे कोणतेही चित्र ऑनलाइन समोर आलेले नाही कारण या जोडप्याने नो-फोन पॉलिसी निवडली आहे.
शुक्रवारी संध्याकाळी सुनील शेट्टीचे खंडाळा घर उजळून निघाले होते आणि अनेक पाहुणे पारंपारिक कपडे परिधान करून नाचताना दिसले. पापाराझी वधू आणि वरांना शोधू शकले नाहीत, परंतु हे फोटो एक आनंद आणि एक पुष्टीकरण म्हणून समोर आले आहेत की खरंच लग्न होत आहे. क्रिकेटर केएल राहुल किंवा अथिया शेट्टी या दोघांनीही त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा सोशल मीडियावर केलेली नाही.
सुनील शेट्टीने रविवारी त्याच्या फार्महाऊसबाहेर तैनात असलेल्या पापाराझींशी संवाद साधला आणि त्यांना वचन दिले. पापाराझींनी सुनिल शेट्टीचे अभिनंदन केल्यामुळे, त्याने त्यांच्याशी एक छोटासा संवाद साधला आणि वचन दिले की तो त्याच्या मुलांना - अथिया आणि राहुलसह संपूर्ण कुटुंबाचा अधिकृत फोटो मिळवून देईल. तो म्हणाला, "मैं कल लेके आता हूं बचों को." त्यानंतर अभिनेता सुनिल शेट्टी पुढे म्हणाला, "आपने जो प्यार दिया उसके लिए बोहोत धन्यवाद."
कुटुंबाकडून लग्नाची ही पहिली अधिकृत पुष्टी होती. हे लग्न खंडाळा येथील शेट्टी फार्महाऊसवर होत आहे. केएल राहुल आणि अथिया आता काही काळापासून डेटिंग करत आहेत आणि टीम इंडियाच्या काही दौऱ्यांवर ही अभिनेत्री क्रिकेटर राहुलसोबत दिसली होती. अथिया ही बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे.
भारतीय क्रिकेटपटूने आपल्या प्रेयसीला तिच्या वाढदिवशी अथिया आणि स्वत:चा समावेश असलेल्या सुंदर सोशल मीडिया पोस्टद्वारे शुभेच्छा दिल्याने या लव्हबर्ड्सने मागील वर्षी त्यांचे नाते अधिकृत केले होते.
सुनील शेट्टीच्या खंडाळा फार्महाऊसवर लग्नाचे विधी शनिवारपासून सुरू झाले असून महंदी व संगीत सोहळा जबरदस्त पार पडला. फार्महाऊस सोनेरी शामियाना आणि फुलांनी सजवण्यात आले होते. व्हिज्युअल पाहता, अथिया आणि राहुलच्या लग्नाची थीम गोल्डन असणार आहे. हा विवाह सोहळा एक जवळचा कार्यक्रम असेल ज्यामध्ये कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांसह निवडक पाहुणे उपस्थित असतील. खंडाळ्यात अथिया आणि राहुलच्या लग्नाला बॉलिवूडमधील सुनिल शेट्टी व आथियाच्या जवळचे सेलेब्रिटी हजर राहतील असे सांगितले जात आहे. तसेच राहुल क्रिकेटर असल्यामुळे क्रिकेट सेलेब्रिटींचीही उपस्थिती असेल असा अंदाज लावण्यात आला आहे. सुरक्षेच्या अभेद्य कवचामुळे घराच्या आतील फोटो अद्याप समोर आलेले नाहीत.
