Ashish Vidyarthi gets married : बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थीने केले वयाच्या ६०व्या वर्षी लग्न
Published: May 26, 2023, 1:56 PM


Ashish Vidyarthi gets married : बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थीने केले वयाच्या ६०व्या वर्षी लग्न
Published: May 26, 2023, 1:56 PM
हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि इतर भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करणारे आशिष विद्यार्थी गुरुवारी विवाहबद्ध झाले. जाणून घेऊया त्यांची दुसरी पत्नी कोण आहे?
मुंबई : बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी गुरुवारी 25 मे रोजी आसामच्या रुपाली बरुआसोबत लग्न केले आहे. त्यांनी अनेक हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे. आशिष विद्यार्थी, यांनी कोलकाता येथील एका क्लबमधील समारंभात लग्नगाठ बांधली आहे. यापूर्वी आशिष यांनी अभिनेत्री शकुंतला बरुआ यांची मुलगी राजोशी बरुआशी लग्न केले होते. तसेच त्यांची नववधू रुपाली, ही गुवाहाटीची आहे. शिवाय त्यांचा कोलकात एका अपस्केल फॅशन स्टोअर आहे.
वयाच्या ६०व्या वर्षी लग्न : मीडिया रिपोर्ट्सनुसार, आशिष आणि रुपालीचे लग्न हे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत झाले आहे . या दोघांनी कोर्ट मॅरेज केले आहे. आशिष आणि रुपालीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चर्चेचा विषय बनला आहेत. वयाच्या ६० व्या वर्षी लग्न झाल्याबद्दलच्या आपल्या भावना मीडियाशी शेअर करताना आशिष म्हणाले, 'माझ्या आयुष्याच्या या टप्प्यावर रुपालीशी लग्न करणे ही एक विलक्षण भावना आहे. आम्ही सकाळी कोर्ट मॅरेज केले होते, त्यानंतर संध्याकाळी रिसेप्शन होते. आशिष विद्यार्थीच्या दुसऱ्या लग्नाची बातमी येताच त्यांच्या नात्याबद्दल जाणून घेण्याचा त्यांच्या चाहत्यांचा उत्साह वाढला. काही लोकांना प्रश्न पडला की, दोघांची भेट कशी झाली? त्यानंतर रुपालीने सांगितले की, 'आम्ही काही काळापूर्वी भेटलो आणि पुढे जाण्याचा निर्णय घेतला. पण आमचे लग्न हे छोटेसे कौटुंबिक व्हावे अशी आमच्या दोघांची इच्छा होती.
सुमारे 300 चित्रपटात आतापर्यत केले काम : बॉलीवूडमध्ये आपल्या खलनायकी भूमिकांसाठी खूप लोकप्रिय असलेले आशिष विद्यार्थी यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी चित्रपटसृष्टीत 1986 पासून काम करण्याची सुरूवात केली. , आशिष विद्यार्थी अनेक हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी, ओडिया, मराठी आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी आतापर्यंत 11 वेगवेगळ्या भाषांमधील सुमारे 300 चित्रपटांमध्ये काम केले आहे.
हेही वाचा : Iifa 2023 : आयफा अवॉर्ड शो सिझन 23च्या मंचावर झळकले सलमान, विक्की आणि अभिषेक
