Matka Queen Jaya Bhagat : मटका क्वीन जया भगत कोण? तिच्या अडचणीत नव्याने झाली वाढ, त्यावरील हा खास रिपोर्ट

author img

By

Published : Sep 29, 2022, 11:33 AM IST

Matka Queen Jaya Bhagat

मायानगरी मुंबईत जुगाराचे अड्डे सक्रिय केल्याप्रकरणी मटका क्वीन ( Matka Queen Jaya Bhagat ) जया छेडा-भगतविरोधात ( Kalyan Bhagat First Started Matka at Mumbai ) मुंबई गुन्हे शाखेने १३ नवे गुन्हे नोंदवले ( Mumbai Police Registered 13 New Cases Agains Jaya Bhagat ) आहेत. फसवणूक आणि महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत जयावर ठपका ठेवण्यात आले आहेत. जयाला तिचा पती आणि मटका क्वीन सुरेश भगत याच्या हत्येप्रकरणी 2013 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात ( Matka Queen Jaya Bhagat Shines ) आली होती.

मुंबई : मायानगरी मुंबईत जुगाराचे अड्डे सक्रिय केल्याप्रकरणी मटका क्वीन जया छेडा-भगतविरोधात मुंबई गुन्हे शाखेने ( Mumbai Police Registered 13 New Cases Agains Jaya Bhagat ) १३ नवे गुन्हे नोंदवले आहेत. फसवणूक आणि महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत जयावर ठपका ठेवण्यात ( Kalyan Bhagat First Started Matka at Mumbai ) आले आहेत. जयाला तिचा पती आणि मटका क्वीन सुरेश भगत याच्या हत्येप्रकरणी 2013 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. सुरेश भगतच्या हत्येप्रकरणी जयासह इतर पाच जणांना दोषी ( Matka King Suresh Bhagat Murder Case ) ठरवले होते. 2008 मध्ये सुरेश भगतची हत्या झाली ( Matka Queen Jaya Bhagat Shines ) होती.

कोण आहे ही मटका क्वीन जाणून घेऊया : मुंबई उच्च न्यायालयाने आजारपणामुळे जयाला 2018 मध्ये जामीन मंजूर केला होता. कोण आहे ही मटका क्वीन जाणून घेऊया. गुन्हे शाखेचे पोलीस सह आयुक्त सुहास वारके यांनी गरीब आणि सर्वसामान्य घरातील नागरिकांना कर्जबाजारी करणाऱ्या या मटक्याची मुंबईतून पाळीमुळे उपटून काढण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. समाजसेवा शाखेच्या पथकाने दाखल केलेले गुन्हे अधिक तपासाकरिता गुन्हे शाखेकडे पाठवण्यात आले आहेत. गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या युनिटचे मिळून एक पथक तयार करण्यात आले असून युनिट 5चे प्रभारी पोलीस निरीक्षक घनश्याम नायर या पथकाचे नेतृत्व करत आहेत.

सर्वात प्रसिद्ध लॉटरी प्रणालींपैकी कल्याण मटका चालवण्यात जयाचा सहभाग : कल्याण आणि मेन बाजार असे दोन प्रकारचे मटका जुगार चालवणाऱ्यांची नावे समाजसेवा शाखेच्या पथकाने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये असली तरी अद्याप त्यांची धरपकड करण्यात आली नसल्याचे विशेष पथक तयार करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. बेकायदेशीर असलेल्या राज्यातील सर्वात प्रसिद्ध लॉटरी प्रणालींपैकी एक असलेल्या कल्याण मटका चालवण्यात जयाचा सहभाग असल्याचा अधिकार्‍यांना संशय आहे. मुंबईत कल्याण भगत व्यतिरिक्त रतन खत्री हा एकमेव व्यक्ती होता. ज्यांना मटका किंग म्हणून ओळखले जात होते.

मटका किंग सुरेश भगतच्या हत्येची कहाणी : मटका किंग सुरेश भगतच्या हत्येची ही कहाणी ( Jaya Bhagat Arrested in Husband Suresh Bhagat Murder Case ) आहे. ज्यामध्ये त्याच्याच पत्नीवर आरोप करण्यात आले होते. मग या कथेत मटका किंगच्या एका भावाने प्रवेश केला, ज्याला आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घ्यावा लागला. या सगळ्यामध्ये एक कट रचला गेला. ज्याचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला. वास्तविक हे संपूर्ण प्रकरण हत्येचा कट आणि ६० लाखांची सुपारी आहे. तथापि, संपूर्ण कथानक समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे मागे जावे लागेल.

कल्याण भगत यांनी प्रथम सुरू केला होता मटक्याचा व्यवसाय : ५०-६०च्या दशकात कल्याण भगत गुजरातमधून मुंबईत आले आणि नंतर येथील मटका किंग बनले. त्या काळी मुंबईत सट्टा खेळला जायचा, ज्याचे नाव मटका. कल्याण भगत यांचे निधन झाल्यावर त्यांचा मुलगा सुरेश भगत याने हे काम पुढे नेले. मात्र, २००८ मध्ये सुरेश भगत याची हत्या करण्यात आली. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या तपासात मटका व्यवसाय हडप करण्याच्या योजनेअंतर्गत सुरेशची हत्या करण्यात आल्याचे समोर आले.

जया भगत हिने अरुण गवळी टोळीतील सुहास रोगेसोबत रचला हत्येचा प्लॅन : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेशची पत्नी जया भगत हिने अरुण गवळी टोळीतील सुहास रोगे याच्यासोबत हा कट आखला. ज्यामध्ये २००८ मध्ये एका ट्रकचालकाला खुनाचा ठेका देण्यात आला आणि त्यानंतर अपघाताचा बनाव रचून ही हत्या करण्यात आली. जया भगत आणि सुहास रोगे यांचा हा प्लॅन फ्लॉप ठरला जेव्हा सुरेशने मृत्यूपूर्वी आपल्या जीवाला धोका असल्याचे मुंबई गुन्हे शाखा आणि उच्च न्यायालयाला सांगितले होते.

जयाचा मुलगा हितेशचा २०१४ मध्येचा झाला होता मृत्यू : पोलिसांनी तपास सुरू करून पत्नी जया भगत, मुलगा हितेश भगत आणि सुहास रोगे यांच्यासह ८ जणांना अटक केली. मात्र, या गुन्हेगारी कथेत सुरेशचा भाऊ विनोद भगतची एंट्री झाली. विनोदला आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घ्यायचा होता आणि तेव्हाच त्याला कळले की, जया जन्मठेपेची शिक्षा भोगत जामिनावर बाहेर आली आहे. ती घाटकोपरमध्ये बहिणीसोबत राहत होती, तर मुलगा हितेशचा २०१४ मध्येच मृत्यू झाला.

विनोद भगतने ६० लाखांची दिली होती सुपारी : जया आणि तिच्या बहिणीच्या हत्येसाठी विनोदने ६० लाखांची सुपारी दिली. मात्र, पोलिसांनी हा कट उधळून लावत सुपारी घेणाऱ्या अन्वर दर्जी याला पकडले. या कहाणीत अन्वर दर्जी हा ६० लाखांच्या सुपारीत चौथे पात्र होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोदने ही सुपारी त्याचा जवळचा मित्र बशीर बेगानी मामू याला दिली होती. बशीर मामूने हे काम जावेदला दिले आणि त्यानंतर पंडित नावाच्या व्यक्तीने ही सुपारी अन्वरला दिली.

मुंबई क्राइम ब्रँचला अन्वरकडून जया भगत आणि तिची बहीण आशा यांचे फोटो सापडले : मुंबई क्राइम ब्रँचला अन्वरकडून जया भगत आणि तिची बहीण आशा यांचे फोटो आणि रेकी व्हिडिओ सापडले आहेत. गुन्हे शाखेचे तत्कालीन डीसीपी अकबर पठाण यांनी सांगितले होते की, पैसे मिळाल्यानंतर मामूने दोन लोकांमार्फत अन्वरकडे हे काम सोपवले होते. तपास केला असता जावेदला बिजनौरमधून आणि पंडितला पालमपूरमधून अटक करण्यात आली. या प्रकरणात पोलीस अनेक दिवस गुंतले होते. आपल्याविरोधात दाखल केलेले सर्व गुन्हे खोटे आहे. आपल्याला खोट्या आरोपात गोवण्यात आल्याचा दावा जयाने केला आहे. तसेच जयाने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. याच आठवड्यात जयाच्या याचिकांवर कोर्ट सुनावणी घेण्याची शक्यता आहे.

मटका क्वीन जयाच्या अटकपूर्व जामीन याचिकांवर या आठवड्यात सुनावणी : अटकपूर्व जामीन अर्जावर अंतिम सुनावणी होईपर्यंत जयावर कोणतीही कारवाई करणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मटका क्वीन जयाच्या काही अटकपूर्व जामीन याचिका २०२२ मध्ये दाखल केलेल्या खटल्यांप्रकरणी आहेत. तर एक याचिका ती तुरुंगात असताना २०१४ च्या खटल्याशी संबंधित आहे. २०१४ च्या प्रकरणातील खटल्याचा तपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे जयाला कोठडीची गरज नाही, असा युक्तीवाद जयाच्या वकिलांनी केला होता. न्यायालयानेही या युक्तिवादाशी सहमती दर्शवली आणि गेल्या महिन्यातच २०१४ च्या खटल्यात जयाची याचिका मान्य केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.