Siwan Hooch Tragedy : विषारी दारूमुळे 7 नागरिकांचा मृत्यू तर अनेक जण गंभीर, पोलिसांनी 16 आरोपींच्या आवळल्या मुसक्या

author img

By

Published : Jan 23, 2023, 6:34 PM IST

Siwan Hooch Tragedy

बिहारच्या सिवानमधील बाला गावात विषारी दारू पिल्यामुळे 7 नागरिकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत आणखीही काही नागरिक गंभीर आहेत. विषारी दारू पिल्यानंतर नागरिकांच्या पोटात दुखायला लागले. त्यानंतर दृष्टी गेल्यामुळे त्यांना सिवानच्या सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. आतापर्यंत या घटनेत पोलिसांनी 16 आरोपींना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सिवान - विषारी दारू पिल्यामुळे 7 नागरिकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत अनेक नागरिक गंभीर झाले आहेत. त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना बिहारमधील बाला गावात घडली आहे. गंभीर नागरिकांना सिवानच्या सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी 16 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत.

दारू पिल्यामुळे पोटात दुखल्यानंतर गेली दृष्टी : बिहारच्या नबीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाला गावातील जनक प्रसाद आणि नरेश बिंद यांना रात्री अचानक पोटात दुखू लागले. त्यानंतर त्यांना डोळ्याने कमी दिसू लागले. त्यामुळे नातेवाईकांनी त्याला सिवानच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्या दोघांनाही मृत घोषित केले. त्यानंतर आणखी काही लोकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत 16 आरोपींना अटक केली आहे.

सात जणांचा झाला मृत्यू : विषारी दारू पिल्यामुळे बाला गावातील अगोदर दोघांना पोटात दुखण्याचा त्रास झाला. त्यानंतर त्यांना डोळ्यांनी कमी दिसू लागला. त्यामुळे नातेवाईकांनी या दोघांना रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मात्र या दोघांच्या मृत्यूनंतर आणखी काही जणांना असाच त्रास होऊ लागल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना यातील 7 जणांचा मृत्यू झाला. मृतात नरेश बीन, जनक प्रसाद, रमेश रावत, सुरेन्द्र मांझी आणि लछन देवराम यांचा समावेश आहे. विषारी दारूमुळे सात जणांचा मृत्यू झाल्याने गावात खळबळ उडाली आहे.

आरोग्य विभागाचे पथक रुग्णालयात : विषारी दारू पिल्यामुळे सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी सरली. त्यामुळे प्रशासनाची झोपच उडाली. आरोग्य विभागाचे पथक तात्काळ रुग्णालयात दाखल झाले. यात त्यासह पीजीआरओ अभिषेक कुमार चंदन, कर्तव्यावरील अधिकारी अनिलकुमार सिंह, सदर रुग्णालयाचे व्यवस्थापक एस रारुलहक उर्फ बीजू यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पोलीस पथकाने 16 आरोपींना अटक केली आहे. मात्र अद्यापही हा मृत्यू विषारी दारूमुळे झाल्याची पुष्टी केली नाही.

अद्यापही 14 नागरिक गंभीर : विषारी दारूमुळे सात नागरिकांचा बळी गेला आहे. त्यानंतरही काही जणांची प्रकृती अद्यापही गंभीर झाली आहे. 14 नागरिक अद्यापही गंभीर अवस्थेत आहेत. त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 6 नागरिकांची दृष्टी गेल्यामुळे खळबळ उडाली होती. आता आणखी काही नागरिकांची स्थिती गंभीर झाली आहे.

नागरिकांनी पिली विषारी दारू : बाला गावातील नागरिकांनी विषारी दारू पिल्यामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी काही नागरिक गंभीर आहेत. याबाबत जिल्हा परिषद सदस्य रमेश कुमार यांनी गावातील काही नागरिकांनी विषारी दारू पिल्याचे सांगितले आहे. यातील दोघांचा मृत्यू झाल्याचे ते म्हणाले. तर आठजण अद्यापही गंभीर असल्याची माहिती फोनवर बोलताना सांगितली. गावात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गावाला छावणीचे स्वरुप आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पोलीस पथक चौकशी करत आहे : बाला गावात विषारी दारू पिल्यामुळे नागरिकांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत जिल्हाधिकारी अमितकुमार पांडे यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी आम्हाला बाला गावात काही नागरिकांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यासह काही जण गंभीर असल्याचेही कळाले आहे. याबाबत आम्ही चौकशी पथकाची नेमणूक केली आहे. रात्री 12.30 पर्यंत 10 नागरिक आले आहेत. त्यातील एका नागरिकाचा मृत्यू येथे आल्यानंतर झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - Man Killed Wife Two Kids : नराधम पतीने पत्नीसह दोन चिमुकल्यांचा खून करुन दारातच पुरले, दोन महिन्यानंतर बाहेर काढले मृतदेह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.