Illegal Abortion Case : वर्ध्यात बेकायदेशीर गर्भपात; सापडल्या भ्रूणांच्या 11 कवट्या आणि 55 हाडे

author img

By

Published : Jan 13, 2022, 2:57 AM IST

Updated : Jan 13, 2022, 1:01 PM IST

कदम हॉस्पिटल

बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याप्रकरणी वर्ध्यात ( Illegal Abortion Case Wardha ) दाखल गुन्ह्याची व्याप्ती वाढू लागली आहे. ज्या रुग्णालयात गर्भपात केल्याचे सांगितले जाते त्या रुग्णालयाच्या परिसरात गोबर गॅसच्या खड्ड्यात भ्रूणांच्या 11 कवट्या आणि 55 हाडांचे अवशेष मिळाले ( Bone Remains Were Found ) आहेत. हे अवशेष वैद्यकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत.

वर्धा - वर्ध्याच्या आर्वी येथील अवैध गर्भपात प्रकरणात धक्कादायक खुलासा होण्याची शक्यता ( Illegal Abortion Case Wardha ) आहे. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील महिला डॉक्टर रेखा नीरज कदम यांच्या कदम हॉस्पिटलच्या आवारात भ्रूणांच्या 11 कवट्या आणि 55 हाडांचे अवशेष मिळाले ( Bone Remains Were Found ) आहेत. हाडांचे अवशेष हे एका जुन्या गोबर गॅसच्या खड्यात मिळाल्याची माहिती आर्वी पोलिसांनी ( Arvi Police Station ) दिली. यात हाडाबद्दलची माहिती वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होईल. पण या हाडांमुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून बीड जिल्ह्यातील सुदाम मुंडे प्रकरणाच्या ( Sudam Munde Case Beed ) दिशेने वाटचाल तर होत नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे.

पोलीस उपनिरीक्षक जोत्स्ना गिरी यांची प्रतिक्रिया

गोबर गॅसच्या खड्यात सापडल्या भ्रूणाच्या 11 कवट्या आणि 55 हाडे -

वर्ध्याच्या आर्वी येथील अवैध गर्भपात प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात अटक असलेल्या महिला डॉक्टर रेखा कदम यांच्या दवाखान्याच्या मागील जुन्या गोबर गॅसच्या खड्यात भ्रूणाचे अवशेष आणि हाडे सापडले आहे. तब्बल 11 कवट्या आणि 55 हाडे आहेत. त्यामुळे या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणात महिला डॉक्टर रेखा नीरज कदम यांची पोलीस कोठडी मिळाली होती आता त्या न्यायालयीन कोठडीत आहेत अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक जोत्स्ना गिरी यांनी दिली आहे.

३० हजारात झाला होता गर्भपात

आर्वी पोलिसांनी ९ जानेवारीला या प्रकरणात अल्पवयीन बलात्कार पीडित मुलीचा बेकायदेशीर गर्भपात केल्याचा गुन्हा दाखल केला. ३० हजार रुपये घेऊन गर्भपात केल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यानंतर १० जानेवारीला बलात्कार करणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या आई वडिलांना अटक करण्यात आली.

हाडांचे अवशेष कशाचे?

महिला डॉक्टर रेखा नीरज कदम यांची पोलीस कोठडी मिळवत चौकशी करण्यात आली. आर्वी तळेगाव मार्गावर असलेल्या कदम हॉस्पिटलच्या आवारात पोलिसांनी कसून शोध मोहीम राबवली. यामध्ये जुन्या गोबर गॅसच्या खड्डयात हाडांचे अवशेष मिळून आल्याने प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणात सूत्रांच्या आधारे मिळालेल्या माहितीत यात ५ ते ७ कवट्या आणि १० ते १२ हाडं मिळून आल्याचे समजते. ही हाडं आणि अवशेष वैद्यकीय विश्लेषणासाठी पाठवण्यात येणार असून, अहवालानंतर अनेक बाबींचा खुलासा होईल. हे अवयव मानवी आहे का? याचाही खुलासा होईल. शिवाय हे अवयव बेकायदेशीर गर्भपाताचे आहेत का? की कायदेशीररित्या गर्भपात करून त्याची व्हिलेवाट योग्यरीतीने लावली गेली नाही? या प्रश्नाचे उत्तर चौकशी नंतरच स्पष्ट होईल. हाडे आणि अवशेष मिळाले अशी माहिती पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांनी दिली.

गर्भपात झाले तरी किती?

प्रकरणाचे गांभीर्य पाहता अहवाल आल्याशिवाय अधिक माहिती देण्यास पोलीसांनी नकार दिला आहे. गर्भलिंग निदान चाचणी मशीन आणि रुग्णालयाला सील करण्याची कारवाई पोलीस प्रशासनाकडून केली जाऊ शकते. यासोबत गर्भपात किती झाले याचा तपास सुरू असून, रुग्णालयातील रेकॉर्डवर असलेल्या नोंदीमध्ये आढळलेल्या त्रुटींचा सखोल तपास केला जाणार आहे. या प्रकरणात महिला डॉक्टर रेखा नीरज कदम यांची पोलीस कोठडी संपल्याने न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यात सहकारी परिचरिकेला अटक करण्यात आली असून, एसडीपीओ सुनील साळुंखे, पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनात पीएसआय जोत्स्ना गिरी, पोलीस कर्मचारी अतुल भोयर, इम्रान खिलची, गणेश खेडकर, सुरज , पराग आत्राम हे तपास करत आहेत.

हेही वाचा - Hailstorm Hit : नागपूर परिसरात भाजीपाला, कापसाला गारपिटीचा फटका

Last Updated :Jan 13, 2022, 1:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.