सिनेमा बनवला पण धर्मवीर आनंद दिघे उद्यानाकडे दुर्लक्ष; उद्यान 18 वर्षांपासून बंद

author img

By

Published : May 13, 2022, 7:35 PM IST

धर्मवीर आनंद दिघे उद्यान

दिवंगत आनंद दिघे यांनी लहान मुलांसाठी वाचविले उद्यान गेल्या 18 वर्षांपासून बंद असल्याचे समोर आले आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने विकसित केलेले हे उद्यान लहान मुलांसाठी खुले करावे, या मागणीसाठी मनसेचे संतोष निकम यांनी सुमारे 45 वेळा ठाणे महानगर पालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्याकडे पालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.

ठाणे - शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचा जीवनपट असलेला ‘धर्मवीर’ हा सिनेमा आज रिलीज झाला आहे. मात्र त्यांनी लहान मुलांसाठी वाचविले उद्यान गेल्या 18 वर्षांपासून बंद असल्याचे समोर आले आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने विकसित केलेले हे उद्यान लहान मुलांसाठी खुले करावे, या मागणीसाठी मनसेचे संतोष निकम यांनी सुमारे 45 वेळा ठाणे महानगर पालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्याकडे पालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.

धर्मवीर आनंद दिघे उद्यानाकडे दुर्लक्ष
धर्मवीर आनंद दिघे उद्यानाकडे दुर्लक्ष

ठाण्यातील वर्तक नगर येथील इमारत क्रमांक ५४, ५५ दरम्यान उद्यानासाठी राखीव असलेल्या भूखंडावर काही गावगुंडांनी अतिक्रमण केले होते. ही बाब आनंद दिघे यांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन हा भूखंड वाचवून त्या ठिकाणी मुलांसाठी उद्यान विकसित करण्याचे आदेश दिले होते. आनंद दिघे यांच्या निधनानंतर सन 2015 मध्ये या भूखंडावर १ कोटी रुपये खर्च करुन उद्यान विकसित करण्यात आले. या मैदानाला ‘धर्मवीर आनंद दिघे‘ असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी मनसेचे संतोष निकम यांनी लावून धरली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे १९ जुलै २०१८ रोजी या उद्यानाला आनंद दिघे यांचे नाव देण्याचा ठराव पारित करण्यात आला. मात्र, या उद्यानाचे लोकार्पण करण्यात आलेले नाही. या उद्यानाचे लोकार्पण करावे, या मागणीची सुमारे ४५ स्मरणपत्रे नागरिकांनी ठाणे प्रशासनाला दिली आहेत. तरीही, शिवसेनेची सत्ता असलेल्या मनपाने या उद्यानाचे लोकार्पण केलेले नाही. परिणामी, कोट्यवधी रुपये खर्च करुनही हे उद्यान अडगळीत पडले आहे.

उद्यानाकडे दुर्लक्ष
उद्यानाकडे दुर्लक्ष

सिनेमा प्रदर्शित पण कामाची दखल नाही - आज धर्मवीर हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. आनंद दिघे यांच्या कार्याची ओळख या सिनेमातून जनमाणसांत होणार आहे. पण, त्यांनीच वाचविलेले उद्यान अद्यापही ठाणेकरांसाठी खुले होत नाही. ही दुर्देवी बाब आहे. आनंद दिघे यांच्या नावाची अ‍ॅलर्जी कोणाला आहे का? असा सवाल उपस्थित करुन सिनेमासोबतच या उद्यानाचेही लोकार्पण करावे, उद्यानाच्या दर्शनी भागात ‘धर्मवीर आनंद दिघे उद्यान” अशा नावाची मोठी पाटी लावण्यात यावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

धर्मवीर आनंद दिघे उद्यानाकडे दुर्लक्ष
धर्मवीर आनंद दिघे उद्यानाकडे दुर्लक्ष

उद्यानात जायला रस्ताच नाही - या गार्डनच्या चारही बाजूंनी असलेले बांधकाम तारेचे कुंपणामुळे व्यापून गेले आहे. त्यामुळे या उद्यानात जाण्यासाठी रस्ता उरलेला नाही. आता या उद्यानात जायचे असेल तर तारेचे कुंपण ओलांडून किंवा भिंतीवरून उड्या मारून जावे लागते. शिवाय दुरावस्था असल्याने या गार्डनमध्ये लहान मुलांशिवाय कोणी दिसत नाही. आपल्या प्रकल्पाच्या शेजारी असलेले गार्डन दाखवून बांधकाम व्यवसायिक हे गार्डन आपलेच असल्याचे ग्राहकांना भासवत घर विकत आहेत. आणि या गार्डनमुळे नफा कमी होत आहेत. मात्र प्रत्यक्षात हे गार्डन महापालिकेचे असून यावर उद्यानाचा आरक्षण देखील आहे.

धर्मवीर आनंद दिघे उद्यानाकडे दुर्लक्ष
धर्मवीर आनंद दिघे उद्यानाकडे दुर्लक्ष
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.