Boy rescued from Chanderi : चंदेरी गडावरून तरुण पडला खोल दरीत; २२ तासाच्या अथक प्रयत्नांनंतर रेस्क्यू

author img

By

Published : May 13, 2022, 1:19 PM IST

Boy rescued from Chanderi

बदलापूर जवळील चंदेरी गडावरून एक बावीस वर्षीय तरुण अचानक खोल दरीत पडल्याची घटना समोर आली आहे. या तरुणाला बदलापूर मधील नेचर एक्सप्लोरर रेस्क्यू टीमने खोल दरीत अडचणीच्या जागेतून 22 तासानंतर सुटका केली. मात्र, तो जखमी अवस्थेत असल्याने त्याला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नाव विराज म्हस्के असून तो मुलुंड येथील रहिवाशी आहे.

ठाणे :- बदलापूर जवळील चंदेरी गडावरून एक बावीस वर्षीय तरुण अचानक खोल दरीत पडल्याची घटना समोर आली आहे. या तरुणाला बदलापूर मधील नेचर एक्सप्लोरर रेस्क्यू टीमने खोल दरीत अडचणीच्या जागेतून 22 तासानंतर सुटका केली. मात्र, तो जखमी अवस्थेत असल्याने त्याला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नाव विराज म्हस्के असून तो मुलुंड येथील रहिवाशी आहे.

डॉक्टरांची प्रतिक्रिया
जखमी विराज हा ट्रेकिंगसाठी चंदेरी गडावर बुधवारी गेला होता. मात्र अचानक तो बुधवारी दुपारी ११ वाजल्याच्या सुमारास खोल दरीत पडला. घटनेची माहिती मिळताच नेचर एक्सप्लोरर रेस्क्यू टीम घटनास्थळी दुपारी चार वाजल्याच्या सुमारास पोहचली. त्यानंतर त्याचा शोध सुरु केला. मात्र, अंधार पडल्याने शोध कार्यात अडथळा येत होता. त्याच आज (गुरुवारी ) सकाळी दहा वाजता योगेश साखरे यांच्या नेचर एक्सप्लोरर या एडव्हेंचर टीमने अथक प्रयत्नाने विराजला गंभीर जखमी अवस्थेत दरीतून बाहेर काढले. त्यानंतर त्याला झोळी मधून चिंचवली गावात आणले, त्यावेळी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका त्याचा जीव वाचण्यासाठी चिंचवली गावात बुधवारी दुपारपासून आरोग्य पथकासह उभी होती.
Boy rescued from Chanderi
चंदेरी गडावरून तरुण पडला खोल दरीत
सर्व स्तरातून कौतुक

विशेष म्हणजे या रुग्णवाहिकेत दोन युवती डॉक्टर क्षितिजा खरे आणि श्रद्धा खरे या चिंचवली गावात बुधवारी मुक्कामाला होत्या. आज सकाळच्या सुमारास जखमी अवस्थेत विराजला दरीतून बाहेर आणल्यावर डॉक्टरांनी प्राथमिक उपचार सुरू केले. त्यानंतर विराजची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर चिंचवली गावातील काही गावकरी, पोलीस पाटील यांच्यासह रेस्क्यू टीम व डॉक्टर क्षितिजा आणि श्रद्धा यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
हेही वाचा - Akbaruddin Owaisi : 'श्वान भुंकतोय भुंकू द्या, उत्तर देऊ नका'; अकबरुद्दीन ओवेसींची जीभ घसरली, म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.