NIA PFI Activist Arrest Solapur: सोलापुरातून एनआयएने मासे व्यवसायिक असिफ शेखला घेतले ताब्यात

author img

By

Published : Sep 27, 2022, 12:43 PM IST

NIA PFI Activist Arrest Solapur

एनआयने देशविरोधी कारवायात गुंतलेल्यांविरुद्ध फास आवळायला सुरुवात केली आहे. राज्यात रात्रीपासून पीएफआयच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू (NIA Solapur action) केली आहे. दरम्यान सोलापुरातील सहारा नगर येथील असिफ शौकत शेख (वय 40 वर्ष, रा. सिद्धेश्वर नगर, सहारा नगर जवळ, सोलापूर) या मासे व्यवसायिकाला ताब्यात घेण्यात (NIA arrested fish trader Solapur) आले आहे. (NIA arrested PFI activist Solapur) गेल्या अनेक महिन्यापासून असिफ हा पीएफआय संघटनेचा सोलापुरातील म्होरक्या म्हणून काम पाहत होता.

सोलापूर : एनआयने देशविरोधी कारवायात गुंतलेल्यांविरुद्ध फास आवळायला सुरुवात केली आहे. राज्यात रात्रीपासून पीएफआयच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू (NIA Solapur action) केली आहे. दरम्यान सोलापुरातील सहारा नगर येथील असिफ शौकत शेख (वय 40 वर्ष, रा. सिद्धेश्वर नगर, सहारा नगर जवळ, सोलापूर) या मासे व्यवसायिकाला ताब्यात घेण्यात (NIA arrested fish trader Solapur) आले आहे. (NIA arrested PFI activist Solapur) गेल्या अनेक महिन्यापासून असिफ हा पीएफआय संघटनेचा सोलापुरातील म्होरक्या म्हणून काम पाहत होता.

गुप्तचर खात्याची मासेविक्रेत्यावर होती नजर - सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असिफ शेख याने अनेकदा काही कार्यकर्त्यांना घेऊन विविध मागण्या करत आंदोलन देखील केले होते. सोलापुरातील स्थानिक गुप्तचर संस्था त्यावर नजर ठेवून होती.

पीएफआयची सोलापुराती धुरा सांभाळायचा - उदरनिर्वाहासाठी असिफ हा मासे तळून विक्रीचा व्यवसाय करत होता. असिफ हा विवाहित आहे. सिद्धेश्वर नगर पाच येथे तो राहावयास आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याने सोलापूर शहरात असलेल्या मदिना चौक येथे मासे तळण्याचा व्यवसाय सुरू केला होता. त्यासोबत पीएफआय या संघटनेची सोलापुरातील धुरा सांभाळत होता. असिफ हा विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यावर होती. त्याला अटक झाल्याने पीएफआयचे सोलापूर कनेक्शन चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

परभणीतूनही चौघांना अटक - राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) टेरर फंडिंग प्रकरणात देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांवर धाडी टाकण्याचा सपाटा लावला आहे. एनआयएने नांदेड येथून एकास तर परभणीतून चौघांना अटक केली होती. या पाचही जणांना न्यायालयाने आठ दिवसाची कोठडी सुनावली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेचे एक पथक बुधवारी रात्री नांदेड शहरात दाखल झाले होते. या पथकाने शहरातील देगलूर नाका भागातून मेराज अन्सारी या पीएफआयच्या सदस्याला ताब्यात घेतले होते.

नांदेडमध्ये एनआयए एटीएसची गो बॅकची घोषणाबाजी - महिनाभरपूर्वीच नांदेडमध्ये एनआयएची दिल्लीची टीम पहाटे ३ वाजता धडकली होती. त्यावेळी देगलूर नाका भागातून एका मौलवीसह अन्य तिघांना ताब्यात घेऊन तब्बल १२ तास चौकशी केली होती. त्यानंतर नोटीस देऊन त्यांना सोडले होते. त्यानंतर मागील बुधवारी रात्री एनआयएचे पथक पुन्हा नांदेड शहरात दाखल झाले. स्थानिक एटीएसच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन देगलूर नाका भागात छापा मारला. पीएफआयच्या मेराज अन्सारी याला ताब्यात घेण्यात आले होते. अन्सारी याचे याच भागात किराणा आणि इतर वस्तू विक्रीचे दुकान आहे. दरम्यान, परभणीतूनही अब्दुल सलाम (३४), महोम्मद निसार (४१, परभणी), महोम्मद जाविद (३५), अब्दुल करीम (३५) या चौघांना एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.