ऍड शहाजी बापू पाटील सांगोल्यातुन दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले

author img

By

Published : Jun 26, 2022, 1:15 PM IST

Ad Shahaji Bapu Patil

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपशी वाटाघाटी सुरु केल्याचे वृत्त आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे (Big blow to Shiv Sena).शिंदे सोबत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदार संघातून शिवसेनेचे आमदार ऍड शहाजी बापू पाटील (Ad Shahaji Bapu Patil ) देखील आहेत. ते सांगोला मतदार संघातून दोन वेळा शिवसेनेने कडून निवडून (was twice elected MLA from Sangola) आले आहेत.

सोलापूर: शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह गुवाहाटी गाठून भाजपशी वाटाघाटी सुरु केल्याचे वृत्त आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.विधानपरिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी आमदारांचा मोठा गट घेऊन राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जबरदस्त हादरा दिला आहे.एकनाथ शिंदे सोबत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदार संघातून शिवसेनेचे आमदार ऍड शहाजी बापू पाटील देखील आहेत. सांगोला मतदार संघातून दोन वेळा शिवसेनेना पक्षाकडून निवडून आले आहेत.

शेकापच्या गणपतराव देशमुख यांना कडवे आवाहन देत शहाजी पाटील निवडून आले. सांगोला तालुक्यातील राजकारणात ऍड शहाजी पाटील हे शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे कट्टर विरोधक समजले जातात. सांगोला विधानसभा निवडणुकीत १९९० पासून सलग पाच वेळा ऍड शहाजीबापू पाटील यांनी आमदार देशमुख यांच्या विरोधात काँग्रेसकडून लढत दिली आहे. 1995 साली त्यांनी गणपत देशमुख यांचा पराभवही केला होता. 1999, 2004 व 2009 या विधानसभेच्या तिन्ही निवडणुकीत त्यांनी 80 हजारांपेक्षा जास्त मते घेतली होती.

हेही वाचा : MLA Praniti Shinde Solapur : 'महाविकास आघाडी सरकार ही लढाई शभंर टक्के जिंकणार'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.