Ajit Pawar : अधिकार सचिवांना मग मुख्यमंत्री घरी बसणार का?; अजित पवारांनी डिवचले

author img

By

Published : Aug 6, 2022, 4:09 PM IST

Opposition leader Ajit Pawar

विरोधी पक्षनेते अजित पवार ( Leader of Opposition Ajit Pawar ) यांनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका ( Ajit Pawar criticizes Eknath Shinde ) केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी मंत्र्यांचे सर्व अधिकार सचिवांना दिलें आहेत. सर्वच काम सचिव करत असतील तर, मुख्यमंत्री कशाला पाहिजे असा टोमना ( Ajit Pawar criticizes Eknath Shinde ) त्यांनी शिंदेना लगावला.

पुणे : राज्यामध्ये एकनाथ शिंदे सरकार ( Eknath Shinde Gov ) आल्यापासून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मंत्रिमंडळ विस्ताराला होणारा उशीर ( Cabinet expansion delayed ) झाला आहे. त्यामुळे राज्यातील काम होत नाहीत अशी टीका होत असताना आता विरोधी पक्षनेते अजित पवार ( Leader of Opposition Ajit Pawar ) यांनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका ( Ajit Pawar criticizes Eknath Shinde ) केली आहे. मुख्यमंत्र्यांचे सर्व अधिकार सचिवांना द्यावे अशी मागणी देखील त्यांनी केली. राज्यात अशी वेळ आज पर्यंत मुख्यमंत्र्याची शपथ घेतल्यानंतर कुठल्याही मुख्यमंत्र्यावर आली नाही. मात्र, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर ही वेळ आली हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे असेही अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्री कशाला पाहिजे - मंत्री नाही म्हणून राज्यातील काम थांबू नये, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांचे सर्व अधिकार सचिवांना दिलें आहेत. त्यामूळ सगळेच काम सचिव करत असतील तर, मुख्यमंत्री कशाला पाहिजे असा टोमना त्यांनी शिंदेना लगावला. मुख्यमंत्र्यांनी सगळे अधिकार मुख्य सचिवांना देऊन घरी बसावे अशी उपरोधीक टीका अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. राज्यात अनेक प्रश्न, समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी मंत्रीमंडळ असते. आता मंत्र्यांनीच सर्व अधिकार सचिवांना दिले आहेत त्यामुळे आमदारांची मंत्रीमंडळाची राज्यात गरज नाही असा चिमटा त्यांनी शिंदे-भाजप सरकारला काढला आहे.

हेही वाचा - woman raped by three men : ३५ वर्षीय महिलेवर तीन नराधमांचा बलात्कार

अजित पवार आज पुणे दौऱ्यावर होते. पक्षाच्या विविध कामासाठी तसेच पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका संदर्भात ते पुण्यात आले होते. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे-फडवणी सरकार यांवर टीका केली. राज्यामधील विरोधी पक्ष नेता म्हणून माझ्याकडे सुद्धा अनेक लोक कामे घेऊन येतात. परंतु या कामाचा पाठपुरावा कुठे करायचा असा प्रश्न आहे. अनेक अधिकाऱ्यांना मी बोलतो, परंतू मंत्री नसल्यामुळे निर्णय घेता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर मंत्रिमंडळ होणं गरजेचे आहे. तसेच आम्ही राज्यपालांना भेटलो त्यावेळी हेच सांगितले की, लवकर मंत्रिमंडळ विस्तार व्हायला पाहिजे असे पवार म्हणाले.

हेही वाचा - Tilak started Ganeshotsav : आजोबा गणपतीची प्रेरणा घेत लोकमान्य टिळकांनी सुरु केला सार्वजनिक गणेशोत्सव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.