संभाजीराजे 'स्वराज्य' संघटना स्थापणार; तर राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याची घोषणा

author img

By

Published : May 12, 2022, 12:49 PM IST

Updated : May 12, 2022, 1:06 PM IST

संभाजीराजे

वेगवेगळ्या पक्षातील लोकांनी देखील मला सहकार्य केलं पाहिजे. मी राजकीय फायद्यांसाठी कधीही काम केलं नाही. माझ्या योगदानाची दखल घेऊन आपण मला राज्यसभेत नक्की पाठवणार असा विश्वास खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केला.

पुणे - शिवशाहूंचा वंशज म्हणून सर्वांना एका छताखाली आणण्यासाठी तसेच सर्वांना संघटित करण्यासाठी, समाजाला योग्य दिशा देण्यासाठी, शिव शाहूंचे नाव जगभरात नेण्यासाठी मी स्वराज्य नावाची नवीन संघटना स्थापन केली आहे. तसेच येणारी राज्यसभेची निवडणूक ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा छत्रपती संभाजीराजे यांनी आज केली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अनुमोदनासाठी आमदारांनी पुढे यावे - राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे. माझा कार्यकाळ समाज हितासाठी, बहुजन, मराठा समाजाला न्याय देण्यासाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी मला सहकार्य करणे गरजेचे आहे. जी संघटना स्थापन केली, त्यासाठी तुमच्या पाठिंब्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच 29 आमदारांनी अनुमोदन देण्यासाठी पुढे यावे अशी विनंती देखील त्यांनी केली. शिवाय मी कुठल्याही पक्षासोबत जाणार नसून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी राज्यभर दौरा करणार आहे. त्यांच्या भावना समजून घेणार त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे देखील राजे यांनी सांगितले.

मराठा आरक्षण आणि शेतकरी अजेंड्यावर - दोन मोठ्या आघाड्या असताना देखील तुम्ही अपक्ष का? असे विचारले असता यावेळी राजे म्हणाले की ते लोकांना आवडले असल्याचे सांगितले. मराठा आरक्षणाबाबत केंद्र आणि राज्याची महत्वाची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांचा विषय माझ्या अजेंड्यावर सर्वात महत्वाचा आहे. कोल्हापूर येथे माझ्या बाबतीत जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे. व्यवस्थापकाने आत जाण्यासाठी रोखले होते. त्याने दिलगिरी व्यक्त केली. तो विषय माझ्यापुरता आहे. आजच्या तुळजापूर बंदचा सरकारने विचार करणे गरजेचे असल्याचेही संभाजीराजे यांनी सांगितले.

महत्वाचे निर्णय -

  • राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार
  • यापुढे कोणत्याही पक्षाचा सदस्य राहणार नाही
  • 'स्वराज्य' नावाची नवी संघटना सुरू करणार
  • संघटनेसाठी राज्यभर दौरा करणार
Last Updated :May 12, 2022, 1:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.