Rules for Using Mask :...असा वापरा मास्क! अन्यथा कोरोना संसर्ग अटळ

author img

By

Published : Jan 13, 2022, 12:58 PM IST

Updated : Jan 13, 2022, 2:15 PM IST

Rules for Using Mask

मास्क वापरण्यासाठी देखील अनेक नियम आहेत, मास्क कोणते वापरायचे, कुठल्या प्रकारचे मास्क परिधान करायचे, मास्कचा कालावधी किती असावा हे सगळे प्रश्न देखील आहेतच. बरेचजण साधे कापडी मास्क वापरताना दिसतात पण ते कितीपत योग्य आहे याविषयी शंका आहे. यासंदर्भात ईटीव्ही भारतचा खास रिपोर्ट..

पुणे - राज्यासह पुण्यात कोरोना पुन्हा वाढताना दिसत आहे. सध्या जी आकडेवारी वाढत आहे, तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत. पुण्यात देखील मागील काही दिवसांपासून जी रुग्णसंख्या वाढत आहे ती आकडेवारी सुद्धा भेडसावणारी आहे. मागील चार दिवसांपासून पुण्यात रुग्णांची संख्या चार हजारांच्या पुढे जात आहे. त्याच अनुषंगाने शहरात कोरोनाचे निर्बंध कडक केलेले पाहायला मिळत आहेत. त्यातच मास्क वापरणे देखील सक्तीचे केले आहे. प्रशासन देखील मास्क वापरण्याबाबत जनजागृती करताना दिसत आहे. दरम्यान मास्क वापरण्यासाठी देखील अनेक नियम आहेत, मास्क कोणते वापरायचे, कुठल्या प्रकारचे मास्क परिधान करायचे, मास्कचा कालावधी किती असावा हे सगळे प्रश्न देखील आहेतच. बरेचजण साधे कापडी मास्क वापरताना दिसतात पण ते कितीपत योग्य आहे याविषयी शंका आहे. यासंदर्भात ईटीव्ही भारतचा खास रिपोर्ट..

...असा वापरा मास्क! अन्यथा कोरोना संसर्ग अटळ

एन-९५ मास्क आधिक सुरक्षित -

संसर्गाचा वेग जास्त असल्याने सद्यस्थितीत सर्जिकल किंवा कापडी मास्कच्या तुलनेत एन-९५ मास्क सुरक्षा प्रदान करू शकतो, असा निष्कर्ष पॅडेमिक रिस्पॉन्स टास्क फोर्स या संस्थेच्या अभ्यासातून समोर आला आहे. याबद्दल पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मागील आठवड्यात कापडी ऐवजी एन-९५ मास्क वापरण्याचे आवाहन देखील केले होते.

15 मिनिटात होऊ शकतो संसर्ग -

नुकत्याच हाती आलेल्या एका अहवालानुसार मास्क न घातलेली व्यक्ती कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यास आणि कोरोनाबाधित रुग्णाने मास्क घातला नसेल तर १५ मिनिटात संसर्ग होऊ शकतो. जर मास्क असेल तर तो बचाव कसा होऊ शकतो आणि संसर्ग होण्याचे प्रमाण देखील खूप कमी आहे. त्यामुळे मास्क वापरणे आणि तेही सर्व नियम पाळून हे सध्या आपल्याला बंधनकारक आहे.

हेही वाचा - India Corona Updates : देशात मागील 24 तासात दोन लाखांपेक्षा जास्त रूग्णांची नोंद

हे आहेत मास्क वापराचे नियम -

आपण बरेचजण मास्क वापरतो. पण ते कितपत फायदेशीर ठरते हे सुद्धा तितकेच महत्वाचं आहे. यात काही नियम आहेत जे वैज्ञानिकरित्या सिद्ध देखील झाले आहेत. रोजच्या वापरातला मास्क किमान तीन पदरी आणि जास्तीत जास्त पाच पदरी असावा. एन-९५ मास्क जरी वापरत असाल तरी तो वारंवार धुवून वापरू नये. सर्जिकल मास्क वापरत असाल तर तो मेल्टब्लोन फिल्टर असलेलाच मास्क वापरावा. त्यातच एन 95 मास्क फक्त 8 तसाच वापरावा हे देखील या अहवालात सांगण्यात आले आहे.

मास्क नेमका का वापरावा -

नुकताच ऑस्ट्रेलियातल्या न्यू साउथ वेल्समध्ये एक अभ्यास करण्यात आला होता. यातून हे समोर आलं की माणूस एका तासात साधारणपणे 23 वेळा आपल्या चेहऱ्याला स्पर्श करत असतो. अश्यातच संसर्गाच्या याकाळात मास्क वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी हा मास्क तुमचं नाक आणि तोंड झाकेल याची काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे.

Last Updated :Jan 13, 2022, 2:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.