PMPL 99 crore rupees Compensation : खासगी ठेकेदारांवर पीएमपीएल मेहरबान, ९९ कोटी रुपयांची कंपन्यांना देणार नुकसाभरपाई

author img

By

Published : Jan 11, 2022, 5:37 PM IST

Updated : Jan 11, 2022, 6:25 PM IST

पीएमपीएल

लॉकडॉऊनच्या काळात खासगी ठेकेदारांच्या बस थांबून होत्या. त्यामुळे या कंपन्यांचे प्रचंड नुकसान झाले. अशा कंपन्यांना नुकसानभरपाई म्हणून 99 कोटी रुपये देण्याचा निर्णय पीएमपीएल संचालक मंडळाने ( PMPL 99 crore rupees Compensation to company ) घेतला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हा विषय प्रलंबित होता. नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय ( PMPL director meeting ) घेण्यात आला आहे.

पुणे - खासगी ठेकेदारांवर पीएमपीएल अधिकच मेहरबान झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, पीएमपीएलच्या संचालक मंडळाने ठेकेदारांना ९९ कोटी रुपये भरपाई देण्याचा निर्णय ( PMPL 99 crore rupees Compensation to company ) घेतला आहे. कोरोना काळात लॉकडाऊन लागल्यामुळे खासगी ठेकेदारांच्या अनेक बस तब्बल तीन महिने एकाच जागेवर उभ्या होत्या. त्यांना नुकसाभरपाई म्हणून ९९ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

लॉकडॉऊनच्या काळात खासगी ठेकेदारांच्या बस थांबून होत्या. त्यामुळे या कंपन्यांचे प्रचंड नुकसान झाले. अशा कंपन्यांना नुकसानभरपाई म्हणून 99 कोटी रुपये देण्याचा निर्णय पीएमपीएल संचालक मंडळाने घेतला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हा विषय प्रलंबित होता. नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय ( PMPL director meeting ) घेण्यात आला आहे.

कंपन्यांचा 50 कोटी रुपयांचा दंड माफ


हेही वाचा-Lata Mangeshkar Corona Positive : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण

तुकाराम मुंढे यांनी ठोठावलेला ५० कोटींचा दंडदेखील माफ
पीएमपीएलचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी व्यवस्थित सेवा न देणार्‍या खासगी बसला 50 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. यामध्ये बी. व्ही. जी. इंडिया, ॲन्टोनी गॅरेजेस, ट्रॅव्हल टाईम कार रेंटल प्रायव्हेट लिमिटेड आणि प्रसन्न पर्पल मोबिलीटी सोल्युशन्स या भाडेतत्त्वावर बस पुरविणाऱ्या कंपन्यांचा समावेश होता. हा सर्व दंड माफ करण्याचा निर्णय संचालक मंडळातर्फे घेण्यात ( waive of Rs 50 crore fine of bus companies ) आला आहे. थांब्यावर बस न थांबविणे, मार्गावर बस उशीरा सोडणे, ब्रेकडाऊन आदी कारणांसाठी हा दंड होता. हा दंड अवाजवी असून करारातील अटींच्या विरोधात आहे, असे म्हणत या दंडाच्या विरोधात कंपन्यांनी न्यायालयातदेखील अपील केले होते. पण हा दंड माफ करण्यात आले असल्याचेदेखील पीएमपीएलच्या संचालक मंडळाने म्हटले आहे.
हेही वाचा-Sharad Pawar on Assembly Election : राष्ट्रवादी तीन राज्यात निवडणूक लढवणार, यूपीत सपाशी युती

Last Updated :Jan 11, 2022, 6:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.