अजित पवारांनी चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा, रुपाली चाकणकरांचा चंद्रकांत पाटलांना खोचक टोला

author img

By

Published : Sep 21, 2021, 3:40 PM IST

Rupali Chakankar

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटील यांना उद्देशून खोचक टोला लगावला आहे. रुपाली चाकणकर यांनी केलेल्या ट्वीटमधून अर्थमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर करमणूक कर लावावा, अशी मागणी केली आहे.

पुणे - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजपा आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप करणे, नेतेमंडळींना लक्ष्य करणे हे प्रकार सुरू आहेत. सातत्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंदकांत पाटील यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटील यांना उद्देशून खोचक टोला लगावला आहे. रुपाली चाकणकर यांनी केलेल्या ट्वीटमधून अर्थमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर करमणूक कर लावावा, अशी मागणी केली आहे.

Rupali Chakankar
रुपाली चाकणकर यांनी केलेले ट्विट
काय म्हटले आहे ट्विटमध्ये -
चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेले एक गोड स्वप्न आहे, कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सध्याला निखळ मनोरंजन होत आहे. महाराष्ट्राचे वित्तमंत्री म्हणून अजित दादांना माझी विनंती आहे की, त्यांनी चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा. केंद्रातील भाजप सरकार जीएसटीचे पैसे देत नाही, निदान चंद्रकांत पाटलांवर करमणूक कर लावण्यास राज्याचा काही भार हलका होईल, असं ट्विट रुपाली चाकणकर यांनी केले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.