Mahalaxmi Puja 2022: राज्यात सर्वत्र मंगलमय वातावरणात महालक्ष्मींचे उत्साहात आगमन

author img

By

Published : Sep 3, 2022, 5:47 PM IST

Mahalaxmi Puja 2022 Arrival

दोन वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा मोठ्या उत्साहात बाप्पाचे ( Ganeshotsav 2022 ) आगमन झाले आहे. गणेशोत्सवात आता घरोघरी आज दुपारी महिलांनी गौरीचे थाटात, परंपरा राखत आगमन ( Jyeshtha Kanishtha Gauri arrives ) केले.

पुणे : दोन वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा मोठ्या उत्साहात बाप्पाचे आगमन ( Ganeshotsav 2022 ) झाले आहे. गणेशोत्सवात आत्ता घरोघरी आज दुपारी महिलांनी गौरीचे थाटात,परंपरा राखत आगमन ( Jyeshtha Kanishtha Gauri arrives ) झाले. पुण्यात गौरी भावे -बीडकर यांच्या घरी गौरायांचे उत्साहात आगमन झाले. ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा केली जाते. सकाळी गौरींची पूजा-आरती ( Mahalaxmi Puja 2022 )करून केलेल्या फुलोरा आणि फराळाचा नैवेद्य दाखवला जातो. सर्वांना धन, धान्य, ऐश्वर्य, आरोग्य मिळो अशी प्रार्थना महिलांनी गौरीकडे केली आहे.

राज्यात सर्वत्र मंगलमय वातावरणात गौरायांचे उत्साहात आगमन...



4 सप्टेंबर रोजी अनुराधा नक्षत्रावर गौरी पूजन - ज्येष्ठा गौरी चे व्रत नक्षत्राशी संबंधित असून ज्येष्ठा नक्षत्रावर आवाहन, अनुराधा नक्षत्रावर पूजन व मूळ नक्षत्रावर विसर्जन करण्याची प्रथा आहे. 3 सप्टेंबर रोजी सूर्योदया पासून सुर्यास्ता पर्यंत पूर्ण दिवस ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी आवाहन मुहूर्त होते. 4 सप्टेंबर रोजी अनुराधा नक्षत्रावर गौरी पूजन (Mahalaxmi Puja 2022 ) होणार आहे. 5 सप्टेंबर रोजी पूर्ण दिवस मूळ नक्षत्र असल्याने सूर्योदया पासून सूर्यस्ता पर्यंत कधीही गौरी विसर्जन करता येणार आहे.

हेही वाचा :Gauri Pujan 2022: ज्येष्ठा गौरी आवाहनासाठी महिला भक्तगण झाल्या सज्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.