Girl Rape in Taljai Forest Pune : बर्थडे पार्टी निमित्त जंगलात नेऊन तरुणीला दारू पाजून केला बलात्कार

author img

By

Published : Dec 7, 2021, 7:48 PM IST

Girl Rape in Taljai Forest Pune

बर्थडे पार्टी निमित्त जंगलात नेऊन 22 तरूणीला दारू पाजली व तिला विवस्त करून तिच्यावर जबरदस्तीने 19 वर्षीय तरूणाने बलात्कार केलाची धक्कादायक घटना पुण्यात ( Girl Rape in Taljai Forest Pune ) उघडकीस आली आहे. याप्रकरणी सहकारनगर पाेलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पुणे - पुण्यातील तळजाई येथील जंगलात नेऊन बर्थडे पार्टी निमित्त दारू पाजून तरुणीवर बलात्कार ( Girl Rape in Taljai Forest Pune ) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सहकार नगर पोलीसांनी तरुणाला अटक केली आहे. याप्रकरणी सहकारनगर पाेलिसांकडे २२ वर्षीय पीडित तरुणीने तक्रार दिल्यानंतर पाेलीसांनी शुभम सिताराम शिंदे (वय-१९, रा.धनकवडी, पुणे) या आराेपीला जेरबंद केले आहे.

पार्टीसाठी जंगलात गेले होते -

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. तरुणीला आराेपी शुभम शिंदे याने पाच डिसेंबर राेजी सायंकाळी पाच वाजण्याचे सुमारास वाढदिवस असल्याचे सांगत पार्टी करण्यासाठी तळजाई शेवटचा बसस्टाॅप याठिकाणी भेट असे सांगितले. त्यानंतर प्रतिक माने या मित्रासह शिंदे तरुणीला भेटला व सदर तिघे तळजाई येथील जंगलात दारु पिण्यासाठी गेली. त्याठिकाणी दारु पिल्यानंतर तरुणीला थंडी वाजू लागल्याने ती त्याचठिकाणी बाजूला झाेपली हाेती.

जबरदस्तीने शारीरिक संबंध -

त्यावेळी आराेपी शिंदे याने तिच्याशी जवळीक साधत तरुणी प्रतिकार करत असताना ही तिला विवस्त्र करत तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत तरुणीने घडलेल्या प्रकाराची कुटुंबीयांना माहिती दिली. कुटुंबीयांनी घडलेल्या प्रकाराची तात्काळ पाेलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पाेलिसांनी आराेपीला अटक केली आहे. याबाबत पुढील तपास सहकारनगर पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक स्वाती देसाई करत आहे.

हेही वाचा - Pune Murder : घरगुती वादातून पतीने केली पत्नीची हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.