माजी गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन; वाचा त्यांचा राजकीय प्रवास

author img

By

Published : Sep 17, 2022, 4:31 PM IST

Updated : Sep 17, 2022, 5:09 PM IST

माजी गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

देशाचे माजी गृहराज्यमंत्री तथा आदिवासी जनतेचे नेते माणिकराव गावित यांचे आज शनिवार (दि. 17 सप्टेंबर)रोजी निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

पुणे/नंदूरबार - देशाचे माजी गृहराज्यमंत्री तथा आदिवासी जनतेचे नेते माणिकराव गावित यांचे आज शनिवार (दि. 17 सप्टेंबर)रोजी निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. नाशिकमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. माणिकरावांच्या जाण्याने आदिवासी तसेच गोरगरीब जनतेच्या दृष्टीने कायम चिंता करणारा एक नेता हरपला अशा शब्दांद पवार यांनी आपल्या शोक व्यक्त केल्या आहेत.

मुलगी निर्मला गावित इगतपुरीच्या माजी आमदार - उद्या (१८ सप्टेंबर) नवापूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या निधनानंवर राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माणिकराव गावित महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये माझे सहकारी होते. मी त्यांना खूप वर्ष जवळून पाहिले आहे. सामान्य कुटुंबातून आणि आदिवासी भागातून आलेला माणूस होता. माणिकराव म्हणजे समाजातील सर्व उपेक्षित घटकांच्या प्रश्नासाठी अंत्यत जागरूकपणे भूमिका घेणारे व्यक्तिमत्व होते. आज माणिकरावच जाण्याने राज्याच्या आदिवासी आणि गरीब जनतेच्या दृष्टीने चिंता करणारा नेता हरपला अशी भावना पवार यांची व्यक्त केली आहे. माणिकराव नंदूरबारमधून तब्बल ९ वेळा खासदार म्हणून संसदेत निवडून गेले होते. आता त्यांचे चिरंजीव आणि मुलगी राजकारणात सक्रिय आहेत. मुलगी निर्मला गावित इगतपुरीच्या माजी आमदार आहेत. तर, चिरंजीव भरत गावित भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य आहेत.

माणिकराव गावित यांची कारकीर्द - नवापूर तालुक्यातील धुळीपाडा येथे २९ ऑक्टोबर १९३४ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण जुन्या काळातील मॅट्रीकपर्यंत झाले. सन १९६५ साली ते नवापूर ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले. धुळे जिल्हा परिषदेत नवापूर गटातुन ते सदस्य म्हणून निवडून आले. १९७१ ते १९७८ साली धुळे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती म्हणून निवडून आले. १९८० साली नवापूरचे आमदार झाले. माणिकराव गावीत हे प्रथमच १९८१ साली खासदार झाले, त्यावेळी त्यांचे 47 वय होते. तेव्हापासून ते आतापर्यंत तब्बल 9 वेळा लोकसभेवर प्रचंड म्हणजे लाखाच्या मताधिक्याने निवडून आले आहेत. १९९९ साली झालेल्या तेराव्या लोकसभेत त्यांना १.३०७७१ इतके प्रचंड मताधिक्य लाभले. देशातील प्रचंड मताधिक्य मिळविणाऱ्या टॉपटेन खासदारामधील एक म्हणून संबंध देशाला ते परिचित झाले. १९८१ ते २००९ हा माणिकराव गावीत यांच्या खासदारकीचा रौप्य महोत्सवी काळ. या काळात त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणून काम केले.

समाज कल्याण समिती - १९८१-८२ मध्ये ते समाज कल्याण समितीचे अध्यक्ष होते. १९८० ते १९८४ या काळात ते महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास महामंडळाचे अध्यक्ष होते. १९९० ते १९९६, १९९८-९९ तसेच २००० या काळात पेट्रोलियम आणि केमिकल व नैसर्गीक वायु या मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले आहे. १९९१ ते ९३ आणि १९९९ ते २००० या काळात त्यांनी रेल्वे मंत्रालयाशी संबंधित सल्लागार समितीवर सदस्य म्हणून कार्य केले आहे. १९९८-९९ या काळात लेबर ॲण्ड वेल्फेअर मंत्रालयाच्या समितीचे सदस्य म्हणूनही कार्य केले आहे. १९९९ ते २००१ या काळात अनु.जाती व अनु.जमाती कल्याण समितीचेही सदस्य होते १९९०-९१ आणि १९९९-२००० या काळात लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांच्या अनुपस्थिती संदर्भातील समितीचे ही ते सदस्य होते. श्रीमती सोनीया गांधी यांनी त्यांना २२ मे २००४ रोजी डॉ. मनमोहनसिंग यांच्या मंत्री मंडळात केंद्रीय गृह राज्यमंत्री म्हणून संधी दिली होती.





सामाजिक कार्याला खऱ्या अर्थाने सुरूवात - धुळीपाडा ता. नवापूर येथील एका गरीब आदिवासी सामान्य कुटूंबात दि. २९ ऑक्टोबर १९३४ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील होडल्या बोंडा गावीत हे एक गरीब शेत मजुर होते. त्यामुळे ना. माणिकरावजी गावीत यांचे बालपण अतिशय खडतर आणि कष्टमय गेले आहे. त्यांचे शिक्षण फक्त जुन्या काळातील मॅट्रीक पर्यंत झाले. उच्च शिक्षण ते घेवू शकले नाहीत. परंतु प्रथम पासुनच नेतृत्वाचे गुण अंगी असल्यामुळे व आदिवासी समाजावर त्याकाळात होण्याऱ्या अन्याय अत्याचारामुळे पेटून उठलेला युवक म्हणून त्यांनी आपले राजकीय कार्य नवापूर गावात आणि परिसरात सुरू केले. परिणामी १९६५ साली ते नवापूर ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले व तेथूनच त्यांच्या राजकीय सामाजिक कार्याला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली.

जंगल कामगार सोसायटयांमध्ये काम करणारा कांग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून ते ओळखले जावू लागले. तत्कालीन कॉग्रेस पुढाऱ्यांच्या सभाचे आयोजन करणे सभेसंबंधीची छोटी मोठी कामे करणे इ. मुळे त्यांचा नाव लौकीक वाढला. त्यानंतर धुळे जिल्हा परिषदेत नवापूर गटातून ते सदस्य म्हणून निवडून आलेत. १९७१ ते १९७८ या काळात माजी मंत्री. सुरूपसिंग नाईक यांच्या सहकायने ते धुळे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती म्हणून निवडून आले समाज कल्याण सभापती म्हणून धुळे जिल्हा परिषदेतील त्यांना दलीत, आदिवासी, बहुजन समाजाचे नेते म्हणून आदराचे स्थान मिळवून दिले. त्यामुळेच १९७८ ते १९८४ या काळात ते धुळे जिल्हा इंदीरा कांग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष झालेत. १९८० साली झालेल्या विधान सभेच्या निवडणूकीत ते नवापूर विधानसभा मतदार संघातुन इंदिरा काँग्रेसचे उमेदवार म्हणून प्रचंड मताधिक्याने निवडून आलेत.

देशात जिल्ह्याचे नाव केले लौकिक - नवापूर तालुका हा एक दुर्गम आदिवासी अविकसीत तालुका म्हणून १९८० पर्यंत ओळखला जात होता परंतु १९८० सालापासुन या तालुक्याचे भाग्य उजळले व दोन मोठया नेत्यांचा उदय या तालुक्यात झाला. सुरूपसिंग नाईक व माजी मंत्री माणिकराव गावीत हे दोन जीवाभावाचे मित्र एकत्र आलेत. एक दुस-याला पुरक अशी जनमाणसातील त्यांची इमेज. होती. दोघानी हो नवापूर तालुक्याच्या सर्वागिण विकासाचा ध्यास घेतलेला होता. के श्रीमती इंदीरा गांधी यांच्या एकनिष्ठ अनुयायी म्हणून दोघेही ओळखले जात होते. कै. श्रीमती इंदीराजी गांधी यांचे इच्छेनुसार नंदुरबार मतदार संघाचे खासदार असलेले सुरूपसिंग नाईक १९८० साली महाराष्ट्र राज्यांच्या मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून दाखल झाले व त्यांच्या रिक्त झालेल्या खासदारकीच्या जागी १९८१ साली माणिकरावजी गावीत प्रचंड मताधिक्याने निवडून आलेत. व त्यानी नवापूर मतदार संघातील आपल्या आमदार पदाचा राजीनामा दिला व त्या जागी सुरूपसिंग नाईक बिनविरोध निवडून आलेत. हा इतिहास आहे. स्वर्गीय माणिकराव गावित यांनी देशात नंदुरबार जिल्ह्याचे नावाचे लौकिक केले आहे.

संसदीय राजकीय वाटचाल - माणिकराव गावीत हे प्रथमच १९८९ साली नंदुरबार मतदार संघातुन खासदार म्हणून निवडून आलेत. तेव्हा पासुन ते आतापर्यंत तब्बल आठ वेळा लोकसभेवर प्रचंड म्हणजे लाखाच्या मताधिक्याने निवडून आले आहेत. १९९९ साली झालेल्या तेराव्या लोकसभेत त्यांना १.३०७७१ इतके प्रचंड मताधिक्य लाभले. देशातील प्रचंड मताधिक्य मिळविणा-या टॉपटेन खासदारामधील एक म्हणून संबंध देशाला ते परिचित झालेत. १९८१ ते २००४ हा माणिकरावजी गावीत यांच्या खासदारकीचा रौप्य महोत्सवी काळ आहे. या काळात त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणून काम करून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. १९८१-८२ मध्ये ते समाज कल्याण समितीचे अध्यक्ष होते. १९८० ते १९८४ या काळात ते महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास महामंडळाचे अध्यक्ष होते. तेथील त्याचे कार्य आदिवासी विकासाच्या दृष्टीने संस्मरणीय अशा स्वरूपाचे होते. १९९० ते १९९६, १९९८-९९ तसेच २००० या काळात पेट्रोलियम आणि केमिकल व नैसर्गीक वायु या मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले आहे. १९९१ ते ९३ आणि १९९९ ते २००० या काळात त्यांनी रेल्वे मंत्रालयाशी संबंधित सल्लागार समितीवर सदस्य म्हणून कार्य केले आहे.

कॉंग्रेस प्रदेश समितीचे उपाध्यक्षपद - १९९८-९९ या काळात लेबर अॅण्ड वेल्फेअर मंत्रालयाच्या समितीचे सदस्य म्हणूनही कार्य केले आहे. १९९९ ते २००१ या काळात अनु. जाती व अनु.जमाती कल्याण समितीचेही सदस्य होते १९९०-९१ आणि १९९९-२००० या काळात लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांच्या अनुपस्थिती संदर्भातील समितीचे ही ते सदस्य होते. अशा प्रकारच्या संसदेच्या विविध समित्यावर त्यांनी कार्य केले आहे. संबंधीत समित्यांच्या कामकाजात त्यांनी आपल्या विचारांचा आणि कार्याचा ठसा उमटविला आहे. साउथ आफ्रीकेला भेट देणा-या संसदेच्या शिष्ट मंडळात त्यांचा समावेश होवून त्यांनी साउथ आफ्रिका या देशाला भेट दिली आहे. मध्यतंरीच्या काळात महाराष्ट्र राज्याच्या कॉंग्रेस प्रदेश समितीचे उपाध्यक्षपद ही त्यांनी भूषविले आहे. तालुका, जिल्हा आणि प्रदेश पातळी वरील अनेक राजकीय सामाजिक समितीत्यांवर त्यांनी काम केलेले आहे. त्यांच्या या सर्व कार्याची नोंद काँग्रेसपक्ष व त्यांच्या नेत्या श्रीमती सोनीयाजी गांधी यांनी घेतली. एक सच्या निष्ठावान जुना अनुभवी आदिवासी समाजाचा लोकनेता म्हणून श्रीमती सोनीयाजी गांधी यांनी त्यांना २२ मे २००४ रोजी डॉ. मनमोहनसिंग यांच्या मंत्री मंडळात केंद्रीय गृह राज्यमंत्री म्हणून स्थान मिळवून दिले. व त्यांच्या कार्याचा उचित गौरव केला. त्यामुळे मा.ना.माणिकरावजी गावीतांच्या कार्याला उधान आले. त्यांच्या केंद्रीय मंत्री मंडळातील प्रवेश हा नंदुरबार या आदिवासी जिल्हयाचा बहुमान समजला जातो.

Last Updated :Sep 17, 2022, 5:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.